नांदेड/ हदगांव शेतकरी संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीला लोडशेडींग साठी दिले निवेदन
महाराष्ट्र मेंबर/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट
हादगाव तालुक्यातील त्रासलेल्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीकडे घेतली धाव एम एस ई बी ला दिला आंदोलनाचा इशारा
बालाजी पाटील बाभळीकर यांनी हदगाव तालुक्यामध्ये लोड सेंडीग कधी आहे काहीच माहित नाही सकाळी सायंकाळी रात्री-बेरात्री लाईटचा लपंडाव हा सर्वसामान्याना शेतकऱ्यांना जनतेला सर्वांना त्रास होत आहे
मात्र येथील लोकप्रतिनिधीला जाग येत नाही का असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी संघटनेचे ता . प्रमूख बालाजी पाटील यांनी सांगितले आहे येथे शेतकऱ्यावर अनेक अन्याय होत आहे काही शेतकरी राजाला विमा सुद्धा मिळाला नाही शेतकऱ्यांचे अनुदान दहा कोटी 71 लाख गेल्या दोन महिन्यापासून बँकेत पडून आहे शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम आज पर्यंत त्यांना मिळाली नाही सदरील हादगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीची वचक नसल्यामुळे आज शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्या अनुषंगाने शेतकरी संघटना हदगाव च्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि .यांच्या बेजबाबदार व भ्रष्ट प्रशासकीय धोरणामुळे महाराष्ट्रात वीजटंचाई निर्माण झाली आहे ही वास्तवता असताना आपली विद्युत वितरण कंपनी मात्र जनतेसाठी लोडशेडिंग करून बळीराजा शेतकऱ्यांवर विद्युत वितरण कंपनीचा अन्याय होत आहे तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना थ्री फेज विद्युत पुरवठ्यात कपात करीत आहे ही बाब सर्वस्वी अन्याय करणारी आहे आपली जबाबदारी दुसऱ्याच्या माथी मारून आपण पापमुक्त होत असे जाहीर करणारी कहानी आहे
परंतु जनतेला व सर्व वास्तवता यांना ही बाब कळाली आहे आपल्या खात्याची कर्तव्य कसुरी आणि शिक्षा मात्र जनतेला आणि शेतकऱ्यांना ही आपली धोरण योग्य नाही म्हणून शेतकरी संघटनेने जबाबदारी पूर्वक ताकीद देऊ इच्छितो अशी ठाम पने निवेदनाद्वारे त्यांनी आज हादगाव येथे एम एस ई बी ऑफिस ला अनेक संघटनेचे नेते व कार्यकर्ते निवेदन देताना होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची दहा तास विद्युत पुरवठा करावा व लोडशेडिंग तीन तास ठेवावी अशी निवेदनाद्वारे शिवाजीराव शिंदे पाटील जिल्हा अध्यक्ष.यांच्या अध्यक्षतेखाली दत्ता पाटील कोळी कर शेतकरी संघटना तालुका प्रमुख युवा तालुकाप्रमुख बालाजी पाटील बाभळी कर. शिवाजीराव वानखडे. जिल्हा उपाध्यक्ष
पंडितराव पतंगे प्रसिद्धी प्रमुख शेतकरी संघटना युवा शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे प्रल्हाद पाटील पाटील हडसणी कर बळीराम मुनेश्वर शेतकरी संघटना व सर्व शेतकरी नाथा हेंद्रे ज्ञानेश्वर हेंद्रे रवी गोरे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.