महागाई च्या विरोधात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी महागाव येथे थाळी बजाव आंदोलन केले
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागाव
आज महागांव दिनांक03/04/2022 रोजी महागाव शहरामध्ये – महागाईच्या विरोधात युवासेनेचे मा. आदित्य ठाकरे साहेब व मा. वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने आज राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मा. सागर देशमुख युवासेना विभागीय सचीव व मा. दिलीपजी घुगे यांच्या आदेशावरून युवासेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने महगांव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब ओबेडकर चौक महागाव येथे युवासेनेने थाळीनाद आंदोलन वाजवून केले. केंद्र सरकारने सत्तेवर येण्या अगोदर जनतेला महागाई कमी करण्यासंदर्भात मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु सध्य स्थितीत केंद्र सरकारला याचा विसर पडलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोना पळवून लावण्यासाठी थाळी वाजवण्याचा चा कयास लावला होता. त्याप्रमाणे थाळी वाजवल्या नंतर तरी कमी मोदी साहेबांना महागाई पळवून गेली पाहिजे लावण्याची सद्बुद्धी लाभावी यासाठी व केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई चे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ज्यामुळे तर कमीत कमी केंद्र सरकारला त्याची लाज वाटून ते महागाई कमी करतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.या आंदोलनात जेष्ट शिवसैनिक तथा नगरसेवक रामराव पाटील नरवाडे, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल प्रकाश पांडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, तालुका संघटक रविंद्र भारती , युवासेना तालुका प्रमुख राम तंबाखे, शहरप्रमुख ओम कुसंगवार, शहरसंघटक समाधान कदम, गजानन शिंदे,सुमीत गोविंदवाड,ओम घोडे,राजू पवार,विनोद पराते, विनोद घोडे, शंकर टेटर, नितीन मेटकर, विवेक चव्हाण, दिणेश वाघमारे, गोकुळ भद्रे, गोपाल दातकर, ऋषीकेश मुधोळ, राधेशाय सुर्यवंशी, पवन राठोड आदि युवासैनिक उपस्थित होते