ताज्या घडामोडी

महागाव/ तालुक्यात शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत केंद्रावर मोठी गर्दी

महागाव/ तालुक्यात शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यासाठी ३१ मार्च पर्यंत केंद्रावर मोठी गर्दी

 

प्रतिनिधी / मारोती तळणकर यांची रिपोर्ट

 

महागाव तालुक्यातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे . केवायसी न केल्यास समोरचा हप्ता मिळत नसल्याने शेतकऱ्यांची ऑनलाइन केंद्रावर एकच गर्दी होत आहे . ग्रामीण भागात कोणत्याच कंपनीचे नेटवर्क वेळेवर मिळत नाही . तर बऱ्याच वेळा नेटवर्क स्लो असल्याने अनेकाना केवायसीपासून वंचित राहावे लागत आहे . केंद्र शासनाने सन २०१ ९ पासून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना घोषित केली आहे . या योजनेत ४ महिन्यात २ हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे . त्यामुळे थोडीफर का असेना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे . परंतु , अनेक पात्र लाभार्थ्यांना योजनेतून मिळणारे पैसे अडचणींच्या कामातही कामी पडत आहेत . पण या योजनेचा लाभ समोर घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे . न केल्यास समोरचा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे . ई केवायसी अपडेट करण्यासाठी , ३१ मार्च डेडलाईन देण्यात आली आहे . त्यामुळे सध्या शेतकरी ई केवायसी करण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी करीत आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *