राज्य उत्पादन शुल्क विभाग भारी पथक परभणी यांची मोठी कारवाई
प्रतिनिधी / खतीब अब्दुल सोहेल
मा विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांचे आदेशान्वये व मा.अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,परभणी. यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक परभणी/हिंगोली. यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.27/03/2022 रोजी मध्य रात्री पाथरी तालुक्यातील मौजे. लिंबा साखर का.ली.लिंबा या ठिकाणी गोवा राज्यात विक्री असलेल्या मॅगडॉल नं.1 व इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की विदेशी मद्य साठा वाहतूक होण्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे सापळा रचून दि.28/03/2022 रोजी सकाळी अंदाजे- 7:00 वाजता एक दुचाकी मोटरसायकल व एक चारचाकी वहान सदर संशयीत वाहनाची तपासनी करून जप्त करण्यात आली खालील वर्णनाचा मुदेमाल मिळून आला.
१) गोवा राज्यातील निर्मित मॅगडॉल नं.1 व्हिस्की 180 मी.ली.क्षमतेच्या एकूण 480 सीलबंद बाटल्या (एकूण-10 बॉक्स) ज्याची अंदाजे किंमत रुपये=76800/
२) गोवा राज्यातील निर्मित इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की 180 मी.ली.क्षमतेच्या एकूण-192 सीलबंद बाटल्या. (एकूण 04 बॉक्स)ज्याची अंदाजे किंमत रुपये = 28800/
३) महारष्ट्र राज्याचे बनावट तयार केलेले मॅगडॉल नं.1 व्हिस्कीचे 180 मी.ली.क्षमतेच्या बाटल्याचे एकूण-216 लेबल. ज्याची अंदाजे किंमत=1080/
४) महाराष्ट्र राज्याचे बनावट तयार केलेले इम्पेरियल ब्ल्यू व्हीस्कीचे 180 मी.ली.क्षमतेच्या बाटल्याचे एकूण-200 लेबल. ज्याची अंदाजे किंमत रुपये=1000/%
५) एक बजाज कंपनीची काळ्या रंगाची पलसर मोटरसायकल जिचा क्र.MH-22 K-4141 आरोपीने टेहळनीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे किंमत=75000/
६) एक पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची नेक्सॉन चारचाकी वहान जिचा क्र.MH-44 Z-4554हि गोवा राज्यातील विदेशी मद्यसाठा वाहतुकीसाठी वापरात आणलेली अंदाजे किंमत रुपये=10,00,000/७) सॅमसंग कम्पनीचा A 215 एक मोबाईल अंदाजे किंमत रुपये 5000/
८) एक VIVO-V20 कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत रुपये=15000/९) एक आय टेल कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत रूपये=700/
असा एकूण रुपये=1203380/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी इसमाचे नावे- 1) शामकुमार वैजनाथ नाईकवाडे वय-38 वर्ष धंदा-मजुरी रा.तुकाराम नगर परळी ता.परळी जि.बीड 2) गणेश जगन्नाथ सुरवसे वय-21 वर्ष धंदा-ड्रायव्हर रा.शिवनगर,परळी ता.परळी जि.बीड 3) गणेश माणिकराव नाईकवाडे वय-23 वर्ष धंदा-मजुरी रा.बरकत नगर, परळी ता.परळी जि.बीड यांना अटक करून यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 80(1) 83,90, व 108 अन्वये गुन्हा नोंद केला. सदर कारवाईत श्री.जी.एल.पुसे निरीक्षक, श्री.बी.एस मंडलवार दुय्यम निरीक्षक, श्री एम.जी.मोरे दुय्यम निरीक्षक सर्वश्री सी.एन.दहिफळे जवान व व्ही.जी.टेकाळे जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक परभणी/हिंगोली. यांनी कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री.बी.एस मंडलवार दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत