राजकारण

उमरखेड तालुक्यातील विदर्भ व मराठवाडडा सीमेवर पैनगंगा नदी सिंचन प्रकल्प बंधारा

उमरखेड तालुक्यातील विदर्भ व मराठवाडडा सीमेवर पैनगंगा नदी सिंचन प्रकल्प बंधारा

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट

 

उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सेवालालनगर , टाकळी ( वन ) , खरबी कमठाला , एकांबा , परोटी , गाडी – बोरी , थेरडी खरवी , मारेगाव , भूरणी , घोटी , अंबाडी अंतर्गत येणाऱ्या राखीव शेत्रातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी पैनगंगा नदी पात्रावरील सिंचन प्रकल्प ( पातळी बंधारा ) जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रस्तावित केला आहे . उमरखेड व किनवट या दोन तालुक्याच्या सीमावर्ती भागावर असलेल्या पैनगंगा अभयारण्य क्षेत्रातील अल्पभूधारक शेतकरी फार मोठ्या कष्टाने आपली शेती करतात . पण सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने अधिकचे उत्पन्न घेऊ शकत नाही . पैनगंगा नदी या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणू शकते . पैनगंगा नदी पात्रावर सिंचन प्रकल्प झाल्यास दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा लाभ घेता येईल आणि आपल्या जमिनीतून अधिक प्रकारचे उत्पन्न घेता येईल . या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे भगीरथ म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा मंत्री ना . जयंतराव पाटील यांच्याशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेडचे तालुकाध्यक्ष बबलू जाधव पाटील यांनी अभयारण्य क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा व्यक्त केल्या . ना . जयंतराव पाटील यांनी प्रत्युत्तरात अधीक्षक अभियंता , उच्च पैनगंगा प्रकल्प मंडळ , नांदेड यांना तात्काळ या अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी त्या अनुषंगाने पैनगंगा नदीवर मारेगाव ते विदर्भ क्षेत्रातील वाघबेट म्हणून ओळखले जाणारे ठिकाणी पातळी बंधारा प्रस्तावित केला. या बंधाऱ्याच्या माध्यमातून किंवा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होली तिची शेती करणे सोपे ठरणार आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *