यवतमाळ येथे सौ. राखीताई रितेश जी पुरोहित. पुसद यांना लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड ने सन्मानित
एस के शब्बीर यांची रिपोट
सौ . राखीताई रितेश जी पुरोहित कुटुंब , परिवाराचा सांभाळ करतानाच संस्थांचा सर्व दृष्टीने विकास करण्याचे जणू वरदानच पुसद येथील पद्मावती पुरोहित महिला अर्बन को – ऑप . क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष राखी रितेश पुरोहित यांना लाभले आहे . जिद्द , चिकाटी आणि परिश्रमाची जोड त्याला मिळाली आहे . राखीताई पुरोहित यांच्या संस्थांनी घेतलेली भरारी , ही त्याचीच फलश्रुती आहे . महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात , यासाठी पद्मावती क्रेडिट सोसायटीची दारे उघडी झाली . महिलांना उद्योग सुरू करता यावा , यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यात आले . सोसायटीने मदतीचा हात पुढे केल्याने अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत . आज नामवंत , विश्वासू प्रतिष्ठान म्हणून या
सोसायटीकडे पाहिले पाऊल महिलांच्या हाती दिले आहे . सौ. राखीताई रितेश जी पुरोहित यांना यवतमाळ येथे लोकमत वूमन अचिव्हर्स अवार्ड ने सन्मानित केले