महागाव तालुक्यातील हिवरा ( संगम ) येथे एटीएम मशीन फोडून रोकड लंपास
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून रोकड केली लपास अज्ञात, चोरट्यांनी पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्यासाठी केले आव्हान, मागील काही वर्षा अगोदर, दिनांक,११/६/२०२१ रोजी गुरुवार च्या मध्यरात्री सुद्धा इंडिया नं1 एटीएम मशीन चोरट्यांनी अशीच लपास केली होती चोरट्यांनी ती मशीन पाण्याच्या गटारीत फोडतोड करून फेकली होती, महागाव तालुका अंतर्गत एटीएम चोरी हिवरा येथे माहूर रोडवर असलेल्या हिताची कंपनीचे एटीएम मशीन मध्यरात्रीच्या वेळी एटीएम मशीन ला गॅस कटरच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तोडफोड करून मशीन फोडून रोकड त्यामध्ये अंदाजित रक्कम,४ लाख चोरट्यांनी लंपास केल्याची घटना हिवरा येथे घडली आहे, घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी रवाना झाला असून अध्याप चोरट्यांचा शोध लागलेला नसून पुढील तपास महागाव पोलिसांनी सुरू केला आहे