अखेर रस्त्यासाठी नागरिक करणार रस्ता रोको आंदोलन
रस्त्याअभावी तीन अपघाती मृत्यू; दहा ते बारा गावकऱ्यांचे रस्तारोको आंदोलन
अखेर रस्त्यासाठी नागरीक करणार रास्तारोको
बिटरगांव बु . प्रतिनिधी शेख इरफान
बिटरगांव बु ते ढाणकी रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने जाताना प्रत्येक प्रवाशाना जिव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. त्याच बरोबर प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी रस्त्याच्या समस्येसााठी कुचकामी ठरत आहे.यासाठी नागरिकांनी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला. लोकनेते अधिकारी यांचे उंबरठे जिझुन काढले मात्र तीन वर्षांपासून पदरी निराशा आली अशा वेळेस एखादा मोठा अपघात होऊन प्राणहानी झाल्यास याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे आता या रस्त्यासाठी परिसरातील तीस गावातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे
बिटरगाव ते ढानकी या
मार्गावरील प्रवास संपूर्ण खड्ड्यांमध्येच प्रवास सुरू आहे. मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याने वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. बिटरगांव बु ते ढाणकी रस्त्याची दुरवस्था अशी दयनीय आहे.या मार्गावरील ४० गावांचा संपर्क येतो.विद्यार्थांना शिक्षणासाठी हाच मार्गने ढाणकी, बिटरगांव बु.उमरखेड तालुक्याला शासकीय कामकाजाला जावे लागते. जरा निष्काळजीपणा झाला तर यमाचा मार्ग धरावा लागतो. या रस्त्याचे बिटरगांव बु ते ढाणकी चे अंतर ९ कीलोमीटर आहे. या प्रवासा दरम्यान वेळ ४० मिनिटे लागतात.व वेग २० ते ३० असतो. या मार्गावर खड्ड्यांमुळे कीतीही महत्त्वाचे काम असो किंवा एखादा गंभीर आजारी रुग्ण असो औषध उपचार घेण्यासाठी ढाणकी किंवा तालुक्याच्या ठिकाणी पोहचण्याची शाश्वती या मार्गावरील प्रवासात नाही. या रस्त्यासाठी अनेक निवेदन देण्यात आले.पण या भागातील नागरिकांना शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून ठेंगा दाखवला जात आहे. आतापर्यंत अनेकदा किरकोळ अपघात झाले तर गंभीर अपघातात तीन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला. बरेच किरकोळ अपघातात झाले.आता नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.कारण अनेक निवेदने देऊन सुद्धा कोणीही दखल घेतली नाही.यामुळे नागरिकांनामध्ये प्रशासकीय व शासकीय यंत्रणेच्या कामचुकार यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता तीन वर्षांपासून झाला नाही. यांचा निषेध करत बंदीभागातील जेवली,बिटरगांव बु., ढाणकी या मार्गावरील खड्ड्यांमुळे कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी होऊ नये पुन्हा कोणता संसार उद्धवस्त होऊ नये यासाठी आता नागरिकांनी उमरखेड तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना नागरिकांना तर्फे दिनांक ७मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात साठीचे निवेदन दिले आहे.यामध्ये बंदीभागातील अनेक गावांतील नागरिक उपस्थित राहुन रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
या गावातील नागरिक करणार आंदोलन
मुरली,सोनंदाभी,मोरचंडी, जेवली, पिंपळगाव, गणेश वाडी,बिटरगांव बु.अकोली, कारंजी, चिंचोली,