नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे
वसमत येथे दि.13 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी आ राजू नवघरे ह्यांच्या कडून गालबोट लागून छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला होता त्यानंतर रडण्याचे नाटक करून खासदारांनीच मला पुतळ्यावर चढायला लावले असे खोटे सांगून स्वतः च पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला याच्या निषेधार्थ तसेच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना दूर करण्यासाठी आज माजी खा.शिवाजीराव माने साहेब,खा.हेमंत भाऊ पाटील,हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.संतोष बांगर साहेब,आ.बालाजी कल्याणकर साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुसळधार वरूण राजाच्या साक्षीने वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पंचगंगेच्या जलाने जलाभिषेक मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.हजारो शिवसैनिक व भक्तांच्या साक्षीने मुसळधार पावसातही छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचा जलाभिषेक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडताना शिवसेनेतील गद्दारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला तसेच छत्रपती साठी आमच्यावर हजारो केसेस झाल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असा विश्वास उपस्थितांना दिला यावेळी निसर्गाला सुद्धा छत्रपतींची झालेली विटंबना मान्य नव्हती म्हणूनच वरुणराजाने आपली हजेरी लावून मुसळधार पावसाने शिवरायांना जलाभिषेक घातला एकीकडे मान्यवरांची जोशपूर्ण भाषणे दुसरीकडे मुसळधार पाऊस वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता प्रत्येक जण आपल्या लाडक्या राजाला मराठी मनाचे मानबिंदू अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जलाभिषेक करण्यासाठी आलेला होता.यावेळी जिप अध्यक्ष गनाजीराव बेले, सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे,जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य विठ्ठल राव चौतमल, नंदकिशोर खिल्लारे,श्रीशैल्य स्वामी,भानुदास राव जाधव,प्रल्हादराव राखोंडे, उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे,परमेश्वर राव मांडगे,संदेशराव देशमुख, तालुका प्रमुख राजुभाऊ चापके,अंकुशराव आहेर,श्रीनिवास पोरजवार, कय्युम शेख,किशोर मास्ट,गुड्डू भाऊ बांगर,मयूर शिंदे,शिवराज पाटील,अजिंक्य नागरे,खली बांगर,शंकर यादव,बाबा अफूने,चेतन बांगर,बालाजी बांगर,गोपाळ बांगर यांच्या सह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.