राजकारण

राष्ट्रीय महामार्ग क्र,३६१, वर भांब राजा ( यवतमाळ) येथील टोल नाक्यावरील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक,

राष्ट्रीय महामार्ग क्र,३६१, वर भांब राजा ( यवतमाळ) येथील टोल नाक्यावरील मनसेचे कार्यकर्ते आक्रमक,

 

जिल्हा प्रतिनिधी एस, के, शब्बीर,,,,,

 

 

टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मनसे आक्रमक

(मनसेने केली टोल वसुली बंद ,दोन तास ठिय्या आंदोलन),,,,,, तुळजापूर नागपूर महामार्ग

*यवतमाळ:-*

महामार्गावरील टोल नाक्यावर असलेल्या मराठी कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात मनसेने आक्रमक भुमिका राबून, टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन,केले व टोल वसुली सतत दोन तास बंद केली.

राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ वर भांब (यवतमाळ)येथील टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या मराठी २२मराठी कामगारांवर एजन्सी कडून वारंवार मजुरांना विनाकारण कामावरून कमी करणे,पगारवाढ न देणे, पीएफ कपात न करणे,साप्ताहिक सुट्टी न देणे,महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तवणुक करणे यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्याकडे मांडला असता त्यांनी याप्रकरणी आक्रमक भुमिका घेत टोल प्रशासनाला यासंदर्भात जाब विचारून मराठी कामगारांवरील अन्याय दूर करा अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला होता चर्चा करूनही समाधान होत नसल्याने आज महाराष्ट्र सैनिक व पीडित कामगारांनी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार,मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, मनसे वाहतुक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शेख साजिदभाई, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यांच्या नेतृत्वात या टोल नाक्यावर धडक दिली त्यावेळी उपस्थित असलेल्या व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक झाले व त्यांनी हा टोल बंद करून वसुली बंद पाडीत वाहनांना वाट मोकळी करून दिली यावेळी मनसेच्या आक्रमकतेपुढे नमते घेत टोल प्रशासनाने कामगारांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी या आंदोलनामध्ये मनसे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, आर्णी तालुकाध्यक्ष सचिन येलगंधेवार, शहराध्यक्ष कपिल ठाकरे, महागाव शहराध्यक्ष संतोष जाधव,महागाव मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर,दिपक आडे,श्रीपाल राठोड,शुभम मोरे,अनिकेत पंडित ,ओम राऊत,शुभम रावते,किशोर बोक्से, गजानन मस्के,निलेश हलबी यांच्यासह मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व कामगार यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता.,,,,,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *