राजकारण

वैफल्यग्रस्त आमदार राजेश पवार यांची सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना असभ्य भाषेचा वापर.

 

वैफल्यग्रस्त आमदार राजेश पवार यांची सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना असभ्य भाषेचा वापर.

प्रतिनिधी / नांदेड एस.के. चांद

नायगाव मतदार संघाचे निष्क्रीय आमदार राजेश पवार यांनी दिनांक : ०८/०२/२०२२ रोजी मंगळवारी नायगाव येथे त्यांच्या संपर्क कार्यालय मध्ये मतदार संघातील जनतेच्या अडी-अडचणी विषयी बैठक बोलवण्यात आली होती. त्यानिमित्त मी चंद्रकांत पवार होटाळकर भारतीय मराठा महासंघ जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असुन मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या संपर्क कार्यालयाला गेलो होतो. यावेळी समाजाविषयी काही प्रश्नावर चर्चा असतांना ते मला असे म्हणटले की, अशा संघटना ३०० ते ४०० आहेत त्यापैकी कांही संघटना ब्लॅकमेलिंग करत आहेत. असे शब्द वापरून सामाजिक काम करणाऱ्या संघटनांचा निष्क्रिय आमदार राजेश पवार यांनी अपमान करुन मुख्य विषयाला हेतूपुरस्पर बगल दिला. तरी त्यांना मी स्वतः सांगू इच्छितो की आम्ही सामाजिक संघटनेत काम करतांना कोणाच्या जमिनी बळकावली नाही किंव्हा गुत्तेदारांकडून टक्केवारी खाली नाही. पण राजेश पवार यांनी गुत्तेदाराकडून वसूली करण्यासाठी एका व्यक्तीची तर नेमणूक केलीच आहे पण वरुन मी प्रामाणिक असल्याचा देखावा करतात हे मतदारसंघातील प्रत्येकाला माहीत झाले आहे. त्यामुळे निष्क्रिय आणि टक्केवारी घेणाऱ्या आमदाराला सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार राजेश पवारांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या नजरेतील ज्या कोणत्या ३०० ते ४००सामाजिक संघटनापैकी ब्लॅकमेलिंग करणाऱ्या संघटना असतील तर त्यांनी सिध्द करून दाखवावे अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा असे जाहीर आवाहन करतो

चंद्रकांत पवार होटाळकर,

ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारतीय मराठ महासंघ नांदेड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *