ताज्या घडामोडी

हिमायतानगर येथील जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळांना वचविने काळाची गरज, असद मौलाना

हिमायतानगर येथील जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळांना वचविने काळाची गरज, असद मौलाना

 

हिमायतनगर प्रतिनिधी /

हिमायतनगर शहरातील असलेल्या जिल्हा परिषद् उर्दू मराठी शाळा हे बंद होण्याच्या मार्गावर आहे,

व् तसेच शासकीय जिल्हा परिषद् शाळांना वाचविन्याची अत्यंत गरज आहे,

कारण यापूर्वी सन 1994 मध्ये हिमायतनगर चा जिल्हा परिषद् हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर होते, त्याकाळी हिमायतनगर येथील उर्दू चे प्रसिद्ध पत्रकार असद मौलाना हे पाच दिवसाचे आमरण उपोषणला देखील बसून हिमायतनगर येथील काँग्रेस चे जेष्ठ नेते स्व,सय्यद अब्दुल्ला सय्यद हसन, उर्दूचे वरिष्ठ पत्रकार स्व, सय्यद जलील अहेमद, स्व,अब्दुल खादर बागवान, व् स्व,सय्यद अहेमद टेलर,

यांचे सोबत शाळा पुन्हा चालू करुन, इथे शिक्षण व्यवस्था वाढवा व् शिक्षकांची भर्ती वाढवा, ह्या मागणी साठी असद मौलाना यांनी 5 दिवसाचे आमरण उपोषण करुण मरता मरता वाचले व संघर्ष केल्यामुळे हिमायतनगर जिल्हा परिषद् शाळा आजपर्यन्त जीवंत होती,

परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे व् गावातील राजकीय पुढारयांचे दुर्लक्षामुळे आज जिल्हा परिषद् शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे,

 

याचे कारण असे की, हिमायतनगर येथील राजकीय पुढार्यांनी स्वतः लाभा साठी इथे खाजगी शाळा उभी केली व् गरीबांच्या लेकरांना विना मूल्य निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवन्याचा काम केले,

 

हिमायतनगर जिल्हा परिषद् हायस्कूल मध्ये अनेक मोठ मोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स झाले, परंतु काही बेखुब पुढारी हे जिल्हा परिषद् शाळांना बदनाम करुण स्वतःची दुकाने खाजी शाळेच्या नावावर उभे केलि आहे,

अश्याच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जिल्हा परिषद् शाळा नांदेड येथील मल्टीपर्पस हायस्कूल, किनवट येथील जिल्हा परिषद् शाळा बंद झाल्याने खाजगी शाळांनी आपली मनमानी करण्यास सुरवात केली आहे,

व् शाळेची फि च्या नावावर हाजरों लाखोंची लूट करण्याच्या व्यापार सुरु केला आहे,

गरीबांची लेकरे शिकावी तर कुठे शिकावी, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,

 

जिल्हा परिषद् शाळा हे गरीबांच्या लेकरांसाठी वर्दान आहे,

त्या मुळे जिल्हा परिषद् उर्दू मराठी शाळा वाचविन्याची अत्यंत गरज आहे,

 

एकदा शासकीय शाळा बंद झाले की खाजगी शाळा संस्था हे पैश्या विना गरीबानंना खाजगी शाळेत पाय ठेवू देणार नाही, हे लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे,

हिमायतनगर शहरातील काँग्रेस चे जेष्ठ नेते स्व, सय्यद अब्दुल्ला सय्यद हसन हे विशेष कार्यकारी अधिकारी असतांना त्यांनी व् त्यांचे सोबत उर्दू चे वरिष्ठ पत्रकार सय्यद जलील अहेमद, सय्यद अहेमद टेलर, अब्दुल खादर बागवान यांनी असद मौलाना यांना समर्थन देवून शासनाला मागण्या केल्या होत्या व् त्यांचे सोबत अनेक लोकांनी संघर्ष करुन आपल्याला शिक्षणाचे वर्दान दिले,

परंतु आपल्या ना करते पना मुळे शाळा बंद होवू नये या साठी आपन स्वतः आपल्या लेकरांना जिल्हा परिषद् शाळेत प्रवेशास टाकावे कोनाच्याही भूलथापाना बळी पळु नका अन्यथा पुढे मार्ग अति कठिन होणार आहे,

खाजगी शाळेच्या सूट बूट घालून मुलगा चांगला दिसतो म्हणजे शिक्षणाचे पुत्र झाले असे नाही, कारण त्याचीही फीस ते आपल्या कडूनच घेत असतात,

इथे शासन हे वेग वेगळ्या योजना जिल्हा परिषद् शाळांना देवून गरीब लेकरांना सवलत देण्याचे काम करीत आहे,

आपल्या व् आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यसाठी व् शिक्षणाला उच्च स्तरावर आणण्यासाठी जिल्हा परिषद् शाळांना वाचविने काळाची गरज आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *