हिमायतनगर तालुक्यातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान,शेतकरी हवालदील,
पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करा अशी शेतकर्याची मागणी
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
शहरा सह तालुक्यातील पळसपुर, डोल्हारी, सिरजणी, एकंबा, बोरगडी,धानोरा कार्ला ,वडगाव , सवणा,टेंभी जिरोना सरसम , कामारी, दिघी, वाघी, जवळगाव,पोटा सह आदी ठिकाणी गेल्या चार दिवसांपासुन ढगाळ वातावरण होते . त्यातच दि .१३ जानेवारी च्या मध्यरात्री झालेल्या अचानक वादळी वाऱ्या सह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याना आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हवामान विभागाचे पंजाब डक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार तालुक्यात चार दिवसांपासुन सर्वत्र ढगाळ वातावरन पसरले होते .
काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला .यात सिरजणी, एकंबा, सह अदि ठिकाणी काल रात्री दि . १३ जानेवारी च्या मध्यरात्री आकाशात ढगांचा गडगडाट होऊन नंतर सलग एक तास पाऊस झाला अनेक भागात तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील गुरेढोरे यासह शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .
अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .
रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून त्याचे तलाठ्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे