पत्रकार प्रकाश जैन यांची कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी निवड.
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा दै. सकाळ चे तालूका बातमीदार प्रकाश जैन यांची कै. सुधाकरराव डोईफोडे पत्रभुषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यात दै. सकाळ सारख्या आघाडीच्या दैनिकात गेली पंचवीस वर्ष सातत्याने काम करीत गोरगरीबासह शेतकरी शेतमजूर व्यथा मांडून ज्वलंत प्रश्न सोडविण्याचे काम जैन यांनी केलेले आहे.भटक्याचे प्रश्न त्यांनी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे नेक काम त्यांनी केलेले आहे हे विशेष. आदिवासी पाड्यावरील रस्ते विकासाचे प्रश्न असो की, शिक्षण, आरोग्य अश्या सर्व प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी आपली लेखनी झिजवली आहे. त्यांच्या आदर्शवत कार्याची दखल हिंदवी बाना लाईव्हच्या वर्धापनदिनी व कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान ने घेतली असून या वर्षीच्या कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी प्रकाश जैन यांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात एका भरगच्च कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रकाश जैन यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
जैन यांच्या पुरस्कार निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.