क्राईम डायरी

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका.

चो-या, दरोडा, खुण अशा घटनांनी हादरला हिमायतनगर तालुका

हिमायतनगर | कृष्णा राठोड

दिनांक- १० डिसेंबर २०२१

 

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या चो-या, दरोडा दिवसा ढवळया खुण पाहत हिमायतनगर तालुक्यातील जनता अत्यंत भयभीत होऊन, रात्रीबेरात्री जागी राहत आपले जिवण जगत आहे.

हिमायतनगर तालुक्याच्या परमेश्वर मंदिर बसस्थानक परिसरात भर दुपारी एका शालेय विद्यार्थायांचा खुण, सरसम, कार्ला पि. सवना ज.,बोरगडी, एकंबा, मंगरुळ, या गावात रात्रीं चोरी करुन चोर पसार झाले होते.

एतकेच नव्हे तर, बोरगडी येथील एका नागरीकांला डोक्याला जबरदस्त मार दिला.

अशा एक नाही अनेक घटनांनी हिमायतनगर तालुका हादरला.

दिवसभर काबाडकष्ट करून रात्री गाड झोप घेत असतांना चोरटे या संधिचा फायदा घेत रात्री चोरी करतात.

गावातील तरुण युवक रात्री झोप मोड करुन ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करत गावाची सुरक्षा करत आहेत.

एकंदरीत तालुक्यातील जनता रात्री भयभीत वातावरणात आपला जीव मुठीत धरून रात्र काढत आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील चो-या, दरोडा आणि खुण या प्रकरणात तालुका ढवळुन निघाला आहे. पोलीस प्रशासनाला या सर्व प्रकरणाचे एकंदरीत आव्हान कसे पेलणार, अशी चिंता तालुक वासियांना झाली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *