राजकारण

हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बाजार येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.  

खडकी बाजार येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

 

 

हिमायतनगर :- प्रतिनिधी

तालुक्यातील खडकी बाजार येथे 26 नोव्हेंबर त्यादिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय बौद्ध महासभा खडकी शाखा वतीने सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा हिमायतनगर तालुका अध्यक्ष प्रताप लोखंडे या कार्यक्रमाच्या या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास हिमायतनगर येथील शेख हनीफ सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय संविधानामध्ये कोण कोणत्या कलमा आपल्या हिताच्या आहेत. व मानव कल्याणाच्या आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहितांना सर्व जातीच्या, प्रवर्गातील लोकांचा अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती असो ओबीसी असो यांना न्याय मिळवून देण्याचे काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना केले. असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

त्याचबरोबर कर्तव्य व अधिकार या विषयी सुद्धा मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी उपस्थित जनसमुदाय यांना शिक्षणाचे महत्त्व काय असते, पाल्यांना योग्य शिक्षण दिले पाहिजे, तरच आपला व समाजाचा उद्धार होतो. असेही त्यांनी म्हंटले त्याचबरोबर शिक्षणाचा उपयोग हा समाज कल्याणासाठी व्हायला पाहिजे, त्यांनी यावेळी म्हटले. प्रमुख वक्त्याच्या मार्गदर्शना नंतर भीम गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

 

भीम गीताचा कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संदीप राजा हनवते यांचा भीम गीताचा कार्यक्रम आनंद बौद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला भारतीय संविधान दिन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष बबन जाधव, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका उपाध्यक्ष शरद हनवते, भारतीय बौद्ध महासभा शाखा संस्कार प्रमुख तथागत रिंगणमोडे, प्रवीण पाटील, माजी उपसरपंच अशोक हनवते, अशोक मरीबा हनवते, रमेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल धोटे, राजू जाधव, हर्षवर्धन हनवते, राजेंद्र हनवते, इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *