राजकारण

हिमायतनगर येते  माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न! 

 

माजी आमदार नागेश पाटील यांनी उपस्थितांना भगवी शाल पांघरून दिली दिवाळीच्या अनंत शुभेच्छा….

 

हिमायतनगर| कृष्णा राठोड

दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त सर्वांसाठी शहरातील बालाजी माध्यमिक विद्यालय बोरगडी रोड हिमायतनगर येथे आज रविवारी सकाळी 11:00ते 4:00 संध्याकाळपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आयोजित केला होता.

माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कार्यक्रमास सर्वांनी मोट्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.व आज रोजी हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम शिवसैनिकांच्या उपस्थितीत .पार पडला आहे.

मागील दोन वर्षाचा काळ अतिशय कठीण व कोरोनाच्या संकटात गेला पण जागतिक महामारी मुळे आपण एकमेकांशी थोडे दूर झालो होतो पण आत्ता कुठे आपण आर्थिक व मानसिक तणावाच्या कठीण काळातून बाहेर पडलो आहोत त्यामुळे आता सधया सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

हिमायतनगर येथील शिवसैनिकांनी डोअर टू डोअर स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.त्यामुळेच आज स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिति दर्शवली होती.

माजी आमदार नागेश पाटील यांनी पत्रकार यांची यांच्याशी संवाद साधला. व सर्व तालुक्यातील जनतेला उपस्थितांना भगवी शाल पांघरून माजी आमदारांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे विलास वानखेडे ,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे ,गजानन चायल, राम नरवाडे सावन डाके ,अमोल धुमाळे, पोटा येथील शिवसैनिक संतोष पुलेवार,बोरगडी येथील शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, प्रकाश रामदीनवार , हनुमंत देशमुख,विशाल राठोड, युवराज देशमुख व शहरातील व्यापारी,ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने आजच्या स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *