क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यातील कोठा परिसरातून रेतीचा अवैद्य उपसा सुरू  

 

चांदराव वानखेडे यांची बातमी

हिमायतनगर|दि.१८:-दसर्यानंतर पैनगंगा नदीपात्राची पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही रेतीमाफियांनी महसूलच्या सबंधित अधिकाऱ्याशी मिलीभगत करून रात्री अपत्रातील रेतीचा अवैद्य उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अवाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या महसुलावर वाळू माफिया अधिकाऱ्याच्या संगनमताने डल्ला मारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. हि बाब लक्षात घेता यंदा तरी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी हिमायतनगर तालुक्यातील नाले व नदीकाठावरील रेतीच्या ठिकाणचे लिलाव करून शासनाच्या महसुलात वाढ करावी. आणि विनापरवाना बेकायदेशीररीत्या शासनाच्या महसुलाची चोरी करून आणणाऱ्या महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) अ अनुसार अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

 

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पैनगंगा नदीपात्रात रेतीचा मोठा साठा झाला आहे. यावर डोळा ठेऊन काही ट्रेक्टर चालक- मालकांनी राजकीय वरदहस्त ठेऊन रात्रीला वाळू चोरीच्या धंद्याला सुरुवात केली आहे. या ठिकाणहून रेतीची चोरी करून शहरात आणून बांधकाम, रस्ते, आदी काम करणाऱ्या गुत्तेदाराना व घरमालकांना विक्री करून मालामाल होऊ पाहत आहेत. रेती उत्खननांच्या सर्व नियमन बगल देवून रात्रंदिवस तस्करी केली जात असल्याने आगामी उन्हाळ्यात जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेल कि नाही यःची चिंता परिसरातील नागरिकांना लागली आहे. महसुल प्रशासनाने नेमलेले काही तलाठी बोक्याच्या भूमिकेत असल्याने रेती तस्कर त्यांच्याशी मिलीभगत करून शासनाला चुना लावत आहेत.

 

हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीवर अनेक रेतीचे घात आहेत. या घाटांचा रेतीचा लिलाव मागील तीन वर्षपासून रखडले आहेत. या ठिकाणच्या रेती घाटाचा लिलाव झाल्यास यापासून शासनाला मोठा महसूल प्राप्त होणार आहे. मात्र या ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गतवर्षी एकही रेतीघाटचा लिलाव झाला नाही. त्यामुळे यावर्षी अद्याप तरी महसुल प्रशासनाने रेतीघाटाची लिलाव जाहीर केला नाही. एवढेच नाहीतर महिला वर्षी शेतवतच्या टप्प्यात महसूल अधिकाऱ्यांनी नदीकाठावरील अनेक गावात रेतीची मोठं महोते ढिगारे जप्त करून हजारो ब्रास रेती ताब्यात घेतली. मात्र त्याचे सुद्धा लिलाव झाले नसल्याने अनेक चोरटयांनी येतीलही रेती पळविली असल्याची शंका नाकारता येत नाही.

 

आता तर दसर्यानंतर पाण्याचा प्रभा कमी झाल्याची संधी साधून पैनगंगा नदीतून काही रेती तस्करांनी महसुल प्रशासनाच्या मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमत करून सर्रास रेतीचा उपसा व वाहतूक करून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरु केली आहे. यामुळे शासणाचा महसूल बुडत असून, वाळू माफियासह अधिकारी – कर्मचार्यांची चांदी होत आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी संबंधितांना सूचित केले मात्र तहसील कार्यालयातील काही चापलुश्या अधिकारी, कर्मचार्यांच्या लालची वृत्तीमुळे वाळू तस्करावर धाडसी कार्यवाही करण्याचे सोडून चार आकडी रक्कम घेवून वाळू दादांना रेती तस्करीची मुभा दिली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत. परिणामी बेसुमार पद्धतीने होत असलेल्या रेती तस्करीमुळे पर्यावरण धोक्यात आले असून, त्यामुळे आगामी काळात नदीकाठावरील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

 

तालुक्यातील पैनगंगा नदीवरून केल्या जात असलेल्या रेती तस्करांना आवर घालण्याकडे जिल्हाधिकारी डॉ विपीन, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देवून नदी काठावरील कोठासह इतर ठिकाणच्या परिसरात होत असलेल्या रेतीच्या धंद्यांना यावर घालावा आणि ज्यांनी रेतीची चोरी करून विक्री केली याबाबतची संबंधित भागात चौकशी करून त्यांचे वाहन जबर करून विदर्भाप्रमाणे कार्यवाही करावी. आणि तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तलाठ्यांना निलंबित करून आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *