हिमायतनगर तालुक्यामध्ये तुलसी विवाह मोठ्या थाटात संपन्न
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून काकड आरतीला सुरुवात करण्यात आली असून पौर्णिमा जवळ येत असल्याने तुळशी विवाह या कार्यक्रमाचा उत्साह वाढला असल्याचे चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मौजे पळसपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज भारुडी भजनी मंडळाच्या वतीने येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हिमायतनगर तालुका उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे यांनी आज दिनांक 17 रोजी सकाळी त्यांचे राहते घरी तुलसी विवाह भजनी मंडळाच्या साह्याने पाच मंगलाष्टके म्हणून पार पडला आहे
यावेळी नागनाथ देवस्थानचे पुजारी गजानन कदम भजनी मंडळाचे पखवाज वादक पांडुरंग वानखेडे सदाशिव वानखेडे भुजंगराव बोंबिलवार दिलीप गाडगेवाड सचिन जाधव हनुमान वानखेडे शिवाजी वानखेडे धीरज जाधव विठ्ठल वानखेडे संभाजी वानखेडे संजय वानखेडे बर्मा बोंबील वार साहेबराव बीलवार बेंद्रे यांच्यासह भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते