राजकारण

सोयाबीन घरी आले कि शेतमालाचे भाव पडतात – खा. हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना 

सोयाबीन घरी आले कि शेतमालाचे भाव पडतात – खा. हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना

ब्युरो रिपोट हिमायतनगर :/

जेंव्हा…जेंव्हा…. शेतामध्ये पिकलेला शेतमाल बाजारात येत असतो… तेंव्हा… तेंव्हा…. शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान होत असते. शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कसे पडतात हे दिल्लीला गेल्यानंतर समजले. शेतमालाच्या दरा संदर्भात समितीच्या बैठकीत अनेक वेळा आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दीड महिन्यापूर्वीच सोयाबीनचा दर १३ हजार प्रति क्विंटल असतांना आज घडीला शेतकऱ्यांच्या दारात सोयाबीन आल्यावर केवळ ४ ते ४ हजार ५०० शे रुपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली जाते. यास केंद्र सरकार जबाबदार असून, एैन सोयाबीन येण्याच्या मोसमातच केंद्र सरकारने १२ लाख टन सोयाबीनची आयात केली. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरले आहेत. अशी संवेदना खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी पोटा (बु) येथील ग्रामभूषण गौरव सत्कार समारंभाच्या मंचावरून बोलताना व्यक्त केली.

यावेळी मंचावर माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, हदगाव नगर परिषदेचे माजी नगराअध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, उपजिल्हा प्रमुख रमेश घंटलवार, प्रगतिशील शेतकरी अजयराव देशमुख सरसमकर, माजी उपजिल्हा प्रमुख डॉ.संजय पवार, शिवसेना जिल्हा समन्वयक परमेश्वर पांचाळ, अवधूत पाटील देवसरकर, सरपंच सौ.लक्ष्मीबाई जाधव, माजी सरपंच सत्वशिलाबाई पुल्लेवार, वाशीच्या सरपंच सौ राठोड ताई, दत्तराम पाटील वायफनेकर, शीतलताई भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी पुढे बोलतांना खा.हेमंतभाऊ पाटील म्हणाले की, सुसंस्कृत व्यक्ती सोबत राहिली कि, चांगली माणसे घडतात. त्यातील हि सत्कार गौरवास पात्र ठरलेल्या व्यक्ती आहेत, ज्या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या गावाने माझ्या व्यथा, वेदना सर्व काही पाहिल्या त्याच गावातील एखाद्या व्यक्तीच्या पुढाकारातून सत्कार होणे, हि भाग्याची गोष्ट आहे. हि प्रेरणा इतर गावांनी सुद्धा घेतली पाहिजे, अश्या प्रेरणा सोहळ्यातून छोट्या छोट्या माणसांच काम जगासमोर आणणे हा चांगला प्रयत्न आहे. असे म्हणत या सोहळ्यासाठी पुढाकार घेतलेले शिवसैनीक संतोष पुल्लेवार यांचं खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी तोंडभरून कौतुक करत शिवसैनिकांना चांगल काम करण्याचा सल्ला देत चांगल्या कामाची दख्खल पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब घेत असतात. त्यातूनच शिवसैनिक घडत असतात त्यातलाच मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून घडलेला कार्यकर्ता ते खासदार समोर उभा अस सांगायला विसरले नाही.शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करतांना खासदार म्हणाले कि, जेंव्हा जेंव्हा शेतकऱ्यांचा माल घरामध्ये येत असतो… तेंव्हा… तेंव्हा…. शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान होत असतात. समाजमाध्यमातून वेगवेगळे विषय मांडून शेतकऱ्यांसह जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले जाते. त्याच बरोबर पेट्रोल डिझेल, स्वयंपाकाच्या गैसच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. या सर्व गोष्टीचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे तितकंच महत्वाच असल्याचही ते म्हणाले. तालुक्यातील सिंचनाच्या संदर्भात पाठपुरावा करून काम मार्गी लावनार असल्याच त्यांनी भाषणातुन सांगितल. यावेळी ज्यांचा कार्यगौरव करण्यात आला त्या सर्वाना पुढील कार्य व सेवेसाठी मनपूर्वक शुभेच्छा खासदारांनी दिल्या.यावेळी उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार, उपशहर प्रमुख राम नरवाडे, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, माजी सरपंच गजानन पाटील, युवासेना प्रमुख विशाल राठोड, राम गुंडेकर, गजानन सूर्यवंशी, शासकिय ठेकेदार कैलास माने, शिवसैनिक संटी कप्पलवाड, गणेश पाटिल, दत्ता जाधव, ग्रा.प.स. शे इरशाद, धोंडबा घुमनर, नागनाथ वच्छेवार, आदींसह शिवसैनिक, पत्रकार, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच खुमासदार सुत्रसंचालन लक्ष्मण सुर्यवंशी यांनी केल तर आभार संतोष पुल्लेवार यांनी मानले.प्राध्यापक आनंदराव देशमुख, प्रा. गोविंदराव माने, प्रा प्रविण सावंत, प्रा. श्रीनिवास पिन्नलवार, पुरवठा अधिकारी शिवाजी जाधव, शिक्षक शिवाजी जाधव, हभप बालाजी माने, कराटे सुवर्ण पदक प्राप्त स्फुर्ती पवळे, आरोग्य विभाग मुंबईत येथे गोपाल खडके आदींचा सत्कार, गौरव कार्यक्रमात खासदार हेमंत पाटिल, माजी आमदार नागेश पाटिल आष्टीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

चांदराव वानखेडे यांची बातमी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *