क्राईम डायरी

हिमायतनगर येथील नवीन रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर महावितरणची धडक कारवाई

 मागील 18 महिन्यापासून होत होती विज चोरी सबंधित गुत्तेदारास अंदाजे 20 लाखाचा दंड लागल्याची शक्यता 

नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे

शहरातील रेल्वे स्थांनकाच्या समोर मागील दोन वर्षा पासून बांधण्यात येत आलेल्या रेल्वे वसाहतींचे बांधकाम सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग च्या कंत्रादारांकडून केले जात होते त्याकामावर फुले नगर येथील गावठाण डि.पि.वरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेद्रे यांच्या घराजवळील पोल वरून डायरेक्ट हुक लाऊन दिवसाला जवळ पास 26.5 K.W. व्याट वीज चोरी केली जात असल्याची माहिती सबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळल्या नंतर त्यांनी ह्या रेल्वे वसाहतीच्या बांधकामावर धडक कारवाई करत घटनास्थळी सापडलेला काळा पिवळा रंगांचा सर्व्हिस वायर अंदाजे किंमत 600 ,काळ्या निळ्या रंगाचा सर्व्हिस वायर अंदाजे किंमत 600 व कीट कॅट 3 नग अंदाजे किंमत 300 असा माल जप्त करून आज दि.20 ऑक्टोंबर रोजी दुपारी सह्हायक अभियंता शहरी पवन भडगे सह तंत्रज्ञ विशाल जेजरवाड यांनी धडक कार्यवाही केली,या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील रेल्वे स्थानका समोर केंद्र सरकारच्या लाखो रुपयाच्या निधीमधून मागील दोन वर्षा पासून नवीन रेल्वे वसाहतीच्या अंदाजे १०० खोल्ल्यांचे बांधकाम केल्या जात आहे या कामाला लागणारी वीज संबंधीत कंत्राटदाराकडून शहरातील फुले नगर येथील डि.पि.वरून आलेला लघुखांब वाहिनीच्या हेद्रे यांच्या घराजवळील पोल वरून डायरेक्ट हुक लाऊन दिवसा ढवळ्या राज रोस पने जवळ पास दिवसाला 26.5 K.W. व्याट वीज चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे त्यामुळे मागील दोन वर्षापासून होत असलेली विज चोरी स्थानिक नागरिकांनी व वार्ताहारांनी येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लक्षात आणून दिल्यानंतर हिमायतनगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराची पोलखोल शोषल मीडियावर झाली त्या नंतर त्यांनी आज दि 20 ऑक्टोंबर रोजी दुपारी घटना स्थळी जाऊन सबंधित अभियंत्यांनी पंचनामा केला व सबंधित डी.एम. दहीफळे व विवेक इंजीनियरिंग यांच्या वर वीज चोरी प्रकरणी दंड लाऊन कार्यवाही करणार असल्याचे सह्हायक अभियंता शहरी पवन भंडगे यांनी उपस्थित प्रतिनिधींना सांगितले, शहरातील रेल्वे वसाहतीवर काम करत असलेल्या कामगारांना वीज चोरीच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा उपस्थित पत्रकांरांनी होत असलेल्या बांधकामाची पाहणी केली तेव्हा तेथे मिटर नसल्याचे आढळून आले पण तिथे लाईट होती हा सर्व प्रकार पहिल्या नंतर शेजारच्या शेतामधील खांबावरून वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आज घडीला बघीतल्या गेल्यास ग्रामीण भागातील नागरीकांसह शेतकरी वर्गाला व शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आवश्यकतेनुसार विज पुरवठा होत नाही सतत महावितरण कडून विज पुरवठा खंडीत केल्या जातो ह्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरीकांना विजेचे बिल भरताना होत आहे एक महीना जर विजेचे बिल थकीत राहिले तर महावितरणकडून विज पुरवठा खंडित करण्याची नोटीस येते पण आता ह्या कंत्रादारांवर कोणता गुन्हा दाखल केल्या जाईल ? व त्यांना महावितरण कंपनी किती दंड लावेल ? ह्याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे, महावितरणच्या अधिकाऱ्याकडून गरीबांसाठी एक नियम आणि श्रीमंतासाठी वेगळा नियम असल्याचे शहरात दिसून येत आहे हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या समोर रेल्वे विभागाच्या वसाहतीचे खुप मोठे बांधकाम चालू आहे. या वसाहतीच्या बांधकामासाठी करोडो रूपयाचा निधी केंद्र शासनाकडून मिळत असताना देखील येथे काम करत असलेले कंत्राटदार गैरव्यवहार करताना आढळून येत आहेत. तरी पण सबंधित अधिकारी व कर्मचारी ह्यांची पाठराखण करत आहेत तब्बल दोन वर्षापासून ह्या ईमारतीच्या बांधकामासाठी लागणारी विज कंत्राटदार चोरी करून वापरत आहे आणि या घटनेची तिळमात्रही माहीती महावितरणच्या अधिकाऱ्यांना नाही ? म्हणजे याचा अर्थ काय समजायचा असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *