गुजराथपाठोपाठ आता तेलंगणामध्येही भारतीय मराठा महासंघाचा झेंडा फडकणार !
दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे भारतीय मराठा महासंघाची बैठक घेण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ. आप्पासाहेब आहेर व राष्ट्रीय सरचिटणीस मान. श्री. राम विठ्ठल शिंदे या नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत तेलंगणा राज्यात भारतीय मराठा महासंघाची उभारणी व स्थापना कशी करावी लागेल याविषयी सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती तेलंगणामधील संघटना बांधणीकरिता भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून श्री श्रीनिवास निळकंठराव घारगे यांची नेमणूक करण्यात आली. तेलंगणा राज्यात भारतीय मराठा महासंघाची स्थापना व्हावी म्हणून अथक परिश्रम घेत असलेल्या श्री सुदेश पाटील यांची तेलंगणा राज्य संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांना संबोधित करतांना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान. डॉ. आप्पासाहेब आहेर यांनी भारतीय मराठा महासंघ ही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालणारी बारा बलुतेदार व अठरापगड जातींच्या मराठी समाजाची संघटना असून, महाराष्ट्रासह अन्य राज्यात जिथे जिथे मराठी बंधुभगिनींचे वास्तव्य आहे अशा सर्व ठिकाणी मराठा महासंघाची स्थापना होत असल्याचे सांगितले व आपण एकत्र असणे हेच आपल्या सर्व समस्यांवरचे एकमेव उत्तर असल्याचे प्रतिपादन केले, याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस मॅन. श्री. राम शिंदे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या बैठक व नियुक्तीच्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री. मंचक राव देशमुख, श्री. गजानन राव जाधव, श्री. सुनील पिंपळे, श्री. विठ्ठलराव पाटील, श्री. चंद्रशेखर चव्हाण, श्री. शशिकांत नवगिरे, श्री. विनोद कुमार जाधव, श्री. राजेश कुमार जावळेकर, श्री शंकर माने, श्री शरद भोसले श्री विनोद शिंदे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक नामवंत व्यावसायिक उद्योगपती, तंत्रज्ञ व संशोधक उपस्थित होते.
शहाजी वरखिंडे प्रसीध्दी प्रमूख. भारतिय मराठा महासंघ देगलूर तालूका