ताज्या घडामोडी

डोल्हारी ते गांजेगाव पुलाजवळील रस्त्याच्या कामाची चौकशी करा माधव शिंदे

 

नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे

हिमायतनगर. तालुक्यात रस्त्याचे डांबरीकरण होत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे वर्तमानपत्रातून रस्त्याच्या कामाचा अफरातफर केल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाहीत आमदार खासदार हे एक प्रकारे कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते रस्त्याच्या डांबरीकरणाचे असो सिमेंट काँक्रीट करणाचे असो नाली बांधकाम असो स्वच्छतेचा प्रश्न असो अशा अनेक गोष्टी हिमायतनगर तालुक्यात आहे पण या बाबतीत सर्वच मौन बाळगत असून कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे असे कामे होत असतील तर ग्रामीण भागातील जनतेने कोणाकडे दाद मागायची.हाच तालुक्याचा विकास समजायचा का?
अशा प्रकारे डोलारी ते गांजेगाव पुला दरम्यान भगवती कंट्रक्शन दोनशे मीटरचे डांबरीकरण केले या रस्त्यासाठी अंदाजे नव लक्ष रुपये मंजूर झाले होते सदरील रस्त्याचे डांबरीकरण एप्रिल-मे २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले केवळ तीन चार महिन्यात डांबरीकरण केलेला रस्ता कुठे गेला हा प्रश्न पडतो असे अनेक निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्यामुळे सदरील रस्त्याला खड्ड्याचे स्वरूप आले याबाबतचे भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांनी चौकशी करून भगवती कंट्रक्शन यांच्यावर कारवाई करून यापुढे कुठल्याही रस्त्याचे डांबरीकरण सिमेंट काँक्रिटचे काम देण्यात येऊ नये तसेच कायमचे काळ्या यादीत यांचे नाव टाकण्यात यावे. अन्यथा उपोषणाचा अवलंब करावा लागेल याची संबंधित विभागाने खबरदारी घ्यावी असा इशारा मराठा साम्राज्य संघाचे संस्थापक बाबाराजे गणपतराव देशमुख महाराष्ट्र राज्य व माधव किसन शिंदे महाराष्ट्र राज्य मराठा साम्राज्य संघ तालुका अध्यक्ष हिमायतनगर यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांना एका निवेदनाद्वारे कळविले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *