खबरदार एस टी विना तिकिट प्रवास करालतर कार्यवाही अटळ सुभाष पवार
नांदेड हिमायतनगर/ नागोराव शिंदे
हिमायतनगर भोकर आगाराने विना तिकिट एस टी बस प्रवास करणाऱ्यांची शोध मोहीम सुरू केल्यामुळे आता विना तिकिट प्रवास करणे प्रवाशांना भोवनार आहे
सुरक्षित प्रवासासाठी एस टी बसने तिकिट काढून प्रवास करण्याचे आवाहन भोकर आगार प्रमुख सुभाष पवार यांनी केले आहे
भोकर आगाराने प्रवासी तिकिट तपासणी व जागरुकता मोहीम दि 25 सप्टेंबर ते 6 आक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे त्या करिता एस टी प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य तिकिट काढुनच प्रवास करावा आणि प्रवास संपेपर्यंत तिकिट जपुन ठेवावे सदर मोहीम आगार प्रमुख सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरिक्षक वाय एच खान एल एस चिठेबोईनवाड एस डी लोखंडे आर सी नरवाडे यांच्या सह आदि एस टी कर्मचारी मोहिमेत समावेश करण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले आहे