ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी….. बाबुराव कदम कोहळीकर.
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे
हदगाव, हिमायतनगर तालुक्यांसह सर्वत्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवीला आहे. सोयाबीन या नगदी पिकांसह कपाशी या उत्पादनांच्या प्रमुख स्त्रोतातील सर्वच पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी आता मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. सातत्यानं कोसळणाऱ्या पावसाने सर्वच ठिकाणी खरिपाची पिके वाया गेली आहेत. विशेषत्वाने इसापूर प्रकल्पातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तथा शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे.
हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन थेट बांधावर चिखलात जावून पा कोहळीकर शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. पाऊस हा सर्वच विक्रमी प्रमाणात बरसला आहे. त्यामुळे नुकसानीची टक्केवारी सर्वत्र सारखीच असून त्यामुळे पंचनाम्याचा फार्स हा खोटा ठरतो आहे. त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. व तसेच इसापूर धरणातून पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पैनगंगा नदी ही आसपास चा परीसर घेवून वाहत आहे. परिणामी नदी काठावरील पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरसकट हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी ही शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी शासनाकडे केली आहे.