राजकारण

कृषी मंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले विठ्ठल पाटील गवळी यांची मागणी

कृषी मंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले विठ्ठल पाटील गवळी यांची मागणी

 

प्रतिनिधी / नायगावं

 

6/9/2021 ते 27/9/2021 पर्यंत झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र व नांदेड जिल्हा व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याचे शेतीतील पिकाचे अवजार याचे व गावातील घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा

 

_____________________

महाराष्ट्र व नांदेड जिल्हा नायगाव तालुक्यातील 6/ 9 /2021 ते 27 /9/2021 रोजी पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे व 8 /9 /2021 रोजी सोडण्यात आलेल्या बारूळ धरणाचे व विष्णुपुरी धरणाच्या पाण्यामुळे तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी येऊन पिकाचे नुकसान झालेले आहे तसेच काही बागायती शेतीमध्ये असलेले तुषार ठिबक विद्युत मोटारी व शेतात करण्यात आलेली पाईप लाईन नुकसान झालेली आहे तसेच गावातील काही नागरिकांचे घराचे नुकसान झाले आहे अशा नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्या हतबल झाला आहे सध्या सणाचे दिवस आले आहेत शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे अवघड झाले आहे खरी पिकावर अवलंबून असलेला शेतकरी हा आता मात्र निराश झालेला आहे त्याच्याकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही तसेच जवळ असलेला पूर्ण पैसा शेतामध्ये टाकून पाण्याने वाहून गेला आहे तसेच सध्या रोगराईमुळे अतिवृष्टीमुळे शेतकरी फारच त्रस्त झालेला आहे अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला वाचवणारे एकमेव देव म्हणून शासन आहे तरी आपणास या निवेदन द्वारे कळविण्यात येतो की महाराष्ट्र शासनाकडून व पिक विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून द्यावी असे निवेदन माननीय दादाजी दगडू भुसे साहेब कृषी मंत्री माजी सैनिक कल्‍याण मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन देण्यात आले आहे अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील गवळी व माधव पा चिंतले चंद्रकांत पाटील पवार होटाळकर शिवाजी पाटील सातेगावकर गजानन पाटील चव्हाण व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दिला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *