आरोग्य

गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

नागोराव शिंदे नांदेड 

किनवट पासून ८ किलोमीटर अंतरावर गणेशपूर येथील सायंकाळी सहा वाजता शेतकरी दत्ता रामराव वानखेडे (वय ५५) शेतात काम करत असताना वन्य प्राणी अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला.शेतकऱ्याच्या तोंडाचा लचका घेतल्याने शेतकरी गंभीर अवस्थेत असून उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सध्या उपचार घेत आहे.सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षा मुळे घडली आहे असे नागरिकांमध्ये चर्चा होत असून वन विभागाने जंगलाच्या भोवती कुंपण करणे गरजेचे असताना देखील वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. सदरची घटना घडल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त येत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *