नांदेड जिल्हा प्रतिनिधी / गणेश राठोड
नांदेड जिल्ह्यातील मोहपुर शिंदगी येथे एका 25 वर्षीय तरुणावर हिंसक वन्य प्राणी अस्वलाने हल्ला केल्याने या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटनाq नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मोहपूर शिंदगी शिवारात ही घटना आज सकाळी घडलीय..
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या तरुणाचे नाव शंकर मधुकर आमले असल्याचे समजते..
हा तरुण सकाळी जनावरे चारण्यासाठी सिंदगी मोहपूर शेतशिवारात गेला होता तेवढ्यातच अचानक अस्वलाने शंकर मधुकर आमले यांच्यावर हल्ला केल्याने या हल्ल्यात शंकर मधुकर आमले हा गंभीर जखमी झालाय..
शंकर मधुकर आमले याच्यावर अस्वलाने हल्ला करून डोक्याला व डोळ्याच्या दोन्ही बाजूने जोराचा चावा घेतल्याने शंकर मधुकर आमले याच्या दोन्ही डोळ्याला मोठी दुखापत झाल्याचे समजते
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला शेजारील शेतकऱ्यांनी प्रथम इलाजासाठी दवाखान्यात आणले असुन
या घटनेची माहिती किनवट येथील वनविभागाच्या वन अधिकाऱ्यांना मिळताच वन अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठाला कळवून वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले..
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शंकर मधुकर आमले याला प्रथम इलाजासाठी 25 हजाराची आर्थिकसाह्य मदत म्हणून वन विभागातर्फे करण्यात आली आहे आणि पुढील उपचारासाठी त्यांना पाठवले आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांनी ही माहिती दिलीय..