क्राईम डायरी

शासकीय कंत्राट दाराचा पंतप्रधान सडक योजनाच्या निविदा भरण्यास बेमुदत बहिष्कार तिन जिल्ह्यातील गुतेदारांचा.

शासकीय कंत्राट दाराचा पंतप्रधान सडक योजनाच्या निविदा भरण्यास बेमुदत बहिष्कार तिन जिल्ह्यातील गुतेदारांचा.

हिमायतनगर:  नागोराव शिंदे

 नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेच्या सर्व शासकीय कंत्राटदाराने दिनांक १६.८.२०२१ पासून निघणाऱ्या सर्व निविदा भरण्यावर बेमुदत बहिष्कार टाकला असल्यचे एका निवेदनाद्वारे केलि आहे 

सविस्तर वृत्त पंतप्रधान सडक योजना व मुख्यमंत्री सडक योजनेतील निवेदेतील दर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य दर सूची( एम एस आर) २०२१-२२ पेक्षा कमी आहे

गौण खनिज खदान ते कामाचे ठिकाण चुकीचे दाखवल्यामुळे प्रत्यक्ष काम करताना खूप तफावत येत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे,गौण खनिज खदान आता कोठेही उपलब्ध नाही व न्यायालयीन आदेश यामुळे गायरानातील उत्खननावर बंदी आदेश असल्याने

कंत्राटदारांना कामाला लागणारे गौणखनिज मालकीच्या जागेतून मागेल ती रक्कम देऊन खरेदी करावी लागत असल्याने त्याचा मोबदला अंदाजपत्रकात गृहीत धरला नाही

आपल्या विभागातील प्रलंबित सर्व प्रकारच्या कामाच्या देयकाचा निधी प्राप्त करण्यासाठी मंत्रालयामार्फत प्रयत्‍न

करण्यासाठी कसरत करावी लागत आहे वरील सर्व कारणाचा तोडगा निघेपर्यंत सर्व प्रकारच्या कामावर ऑनलाइन निविदा सादर करण्यावर बहिष्कार टाकला आहे असे नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार हे टाकत आहेत असे बिल्डर अशोसीयन नांदेड यांनी एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *