ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा –
हिमायतनगर /नांदेड प्रतिनिधी .( नागोराव शिंदे दि.६:-।
उर्ध्व पेनगंगा प्रकल्प
ईसापुर धरणाचा पाणी साठा ८७ टक्के झाल्यामुळे पेनगंगा नदिकाठच्या गांवाना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, याबाबतचे पत्र ,उमरखेड, महागांव, कळमनुरी, हदगांव, हिमायतनगर, माहूर, किनवट आदी तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे.
उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते कि, दिनांक६/९/२०२१ रोजी सकाळी 6 वाजता ईसापुर धरणाची जलाशय पाणी पातळी ४३९.७२ मीटर झाली असुन, जिवंत साठा ८४५.२८ दलघमी (८७.६८ %) झालेला आहे. सद्यस्थित्तित ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस पडत असल्याने धरणात पाण्याचा येवा होत आहे. त्यामुळे जलाशय पाणी पातळीत वाढ होत आहे.
करीता पाण्याचा येवा पाहता इसापुर धरणाचा मंजुर जलाशय प्रचलन आराखडा (ROS) ९०% विश्वासाहर्ता) नुसार दि.१५/९/२०२१1पर्यंत पाणी पातळी ४४०.८५ मीटर (९८.५१%) ठेवावी लागणार आहे. धरण सूरक्षीतते च्या दृष्टीने ईसापुर धरणातुन वक्रद्वार द्वारे कोणत्याही क्षणी धरणात येणारे अतिरीक्त पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडावे लागेल. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ होऊन पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित व वित्त हानी होवु नये म्हणुन आपल्या तालुक्यातील पेनगंगा नदी काठच्या दोन्ही तिरावरील गावातील नगरिकांना आपली गुरेढोरे , घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी ठेवणे व नगरिकांनी सुरक्षित स्थळी राहणे बाबत आपल्या स्तरावरुन सुचना द्यावी हि असे पत्रात लिहिले आहे. तसेच पेनगंगा नदिकाठावरील गावांमध्ये वरील प्रमाणे दवंडी द्वारे जाहिर करणे असे एच.एस.धुळगंडे पुरनिंत्रण अधिकारी ईसापुर धरण तथा उपविभागीय अभियंता उर्ध्व पेनगंगा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग क्रमांक १ पेनगंगानगर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.