सामाजिक अस्तित्वाच वास्तव प्रतिबिंब अण्णांनी साहीत्यातून मांडल राजू नरवाड
दोंवलतखांन काळी / दलित शोषित समाजाच्या दु:ख वेदना व सामाजिक व्यवस्थेची वास्तविक मांडणी प्रतिमा व प्रतिकांचा वापर करून समाजमनाच प्रतिबिंब आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहीत्यातून मांडल त्यांच लिखाण साहीत्य वाचकांच्या अंगावर रोमांच उभ करते म्हणून ते खरे लोकशाहीर ठरतात असे प्रतिपादन राजू नरवाडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमित्य अयोजित कार्यक्रमात केले
डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधीनीच्या वतीने आयोजीत संध्यासंदेश अभ्यासीकेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शेख हुसेन शेख हनिफ तर प्रमुख पाहूणे म्हणून उस्मान डोसाणी,रमेश ढगे हे होते. तर प्रमुख उपस्थिती संदेश रणवीर कपील इंगोले, कोमल श्रावणे, राजू कांबळे,अरविंद गरडे, गजानन गरडे, नारायण गरडे, संतोष भालेराव यांची होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पुजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमात जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव असे ही नरवाडे पुढे म्हणाले कार्यक्रमाचे संचालन अरविंद गरडे यांनी तर धम्मानंद बनसोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधीनीच्या कार्यकर्त्यानी प्रयत्न केले.