पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
पात्र लाभार्थ्यांचे प्रपत्र क्रमांक ड मध्ये नावे समाविष्ट करा नागोराव शिंदे
ब्योरो रिपोट,/एस.के.चांद हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटुन एक निवेदन सादर केले आहे
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की 2011 मध्ये झालेल्या प्रधानमंत्री घरकुल योजना यामध्ये पात्र लाभार्थ्यांचे नाव न येता धनदांडग्यांचे ज्यांना निवाऱ्याची आज रोजी आवश्यकता नसलेल्या त्यांचे पक्के घर असुन त्याचे नावे यादी मध्ये समाविष्ट झाल्याने पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी आज नांदेड येथील जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले आहे या वेळी कोंडीबा कदम आनंदराव जाधव शंकर गायकवाड मारोती कोमलवार शिवाजी देवसरकर सुधाकर देवसरकर बाबुराव वानखेडे संतोष सूर्यवंशी दिगंबर माने अमोल राने भुंजेगराव बोंबिलवार यांच्या सह आदि लाभार्थ्यां उपस्थित होते