क्राईम डायरी

हिमायतनगर तालुका कामारवाडी येथील प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या,

 

ब्योरो रिपोट, एस.के.चांद

हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे वय २3 व शारदा खंडू माने वय २6 वर्ष रा. चिकाळा कामारवाडी यां दोघांमध्ये मागील अनेक दिवसापासून प्रेम संबंध जुळले होते. विवाहित असलेली ती युवती आपल्या पतीसोबत वारंवार होत असलेल्या भांडणामुळे मागील काही वर्षांपासून कामारवाडी येथे असलेल्या मामाच्या घरी वास्तव्यास होती. यामध्ये या दोघांचे प्रेमसंबंधीची माहिती नातेवाईकांना समजली आणि त्यांनी व दत्ता नामक युवकाच्या घरच्यांनी दोघाच्या प्रेम संबंधाला विरोध होऊ लागला होता. त्यामुळे दत्तांच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न करण्याचे ठरविले आणि सोयरीकही करण्यात आली होती.

मात्र दत्ता शारदा सोबत लग्न करण्याच्या विचारात होता. हे लग्न झाले तर शारदसोबत आपले प्रेमसंबंध तुटतील या विवंचनेत तो होता. याच विवंचनेत दोघांनी एकमेकांना भेटून टोकाचे पाऊल उचलले. आणि शनिवारी पहाटच्या रामप्रहरी गांवालागत असलेल्या वानखेडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळी उघडकीस येताच कामारवाडीचे पोलिस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याला माहिती देतच तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल हजार झाले. आणि या प्रेमीयुगलाच्या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटनेचा स्पॉट पंचनामा करून दोघांचे प्रेत हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी उशिरा या दोघांनाचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेचा पुढील तपास हिमायत नगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार हेमंत चोले हे करीत आहेत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *