नादेंड प्रतिनिधी :-
रामतीर्थ ता.बिलोली येथील सुपुत्र व पत्रकार शेख गौस चाॅदसाब रामतीर्थकर यांची आॅल ईडींया मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
एम आय एम पक्षाचे पक्ष प्रमुख तथा खासदार बॅरीस्टर असदोद्दीन आवेशी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला नादेंड जिल्हाध्यक्ष मीर्झा अमजद बेग यांनी शेख गौस रामतीर्थकर यांच्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली. गेल्या अनेक वर्षापासून शेख गौस रामतीर्थकर हे एम आय एम पक्षात देगलुर बिलोली विधानसभा अध्यक्ष पदावर काम पाहत होते त्यांच्या सामाजीक कामाची पोच पावती दीली आणि दिवाळीच्या दिनीच मीर्झा अमजद बेग यांनी त्यांची निवड करून त्यांना दीपावलीची आगळी वेगळी भेट दिली. शेख गौस रामतीर्थकर यांची एम आय एम पक्षाच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी प्रत्यक्ष, दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .यावेळी एम आय एम पक्षाचे नादेंड जिल्ह्याचे पदाधिकरी व सर्व तालुक्यातील पदाधिकरी व कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते