तालुका प्रतिनिधी/मो.मुुुब्बसिर
पुसद: येथील ज्योतिर्गमय शाळेच्या सभागृहात पत्रकार शंकर माहुरे द्वारा संपादित साप्ताहिक समाज – मुद्रा या मुखपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
साप्ताहिक समाज-मुद्रा च्या प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करताना माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात प्रिंटमीडीयाचे महत्त्व कमी झाले. असले तरीही हे काळ वर्तमानपत्रासाठी निश्र्चित आव्हानात्मक असल्याचे प्रतिपादन केले तर ज्येष्ठ पत्रकार के.जी चव्हाण सर यांनी सुद्धा या काळात अनेक साप्ताहिक आले यावर भाष्य केले परंतु या तंत्रयुगाच्या काळात साप्ताहिक वृत्तपत्र चालविणे हे तारेवरची कसरत आहे असे विचार व्यक्त केले.हे सर्व वक्ते ज्योतिर्गामय शाळेच्या सभागृहात पत्रकार शंकर माहुरे द्वारा संपादित साप्ताहिक समाज-मुद्रा च्या प्रकाशन सोहळ्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार ॲड.निलयभाऊ नाईक, भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ महासचिव डॉ.सौ. आरती फुफाटे जेष्ठ पत्रकार के.जी. चव्हाण व प्रा. दिनकर गुल्हाने, बाबसाहेब नाईक सुतगीरणीचे अध्यक्ष
समाज भूषण राजेश आसेगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.एस.झळके, आदिवासी समाजचे नेते ज्ञानेश्वर तडसे, पत्रकार, ललित सेता,दीपक हरीमकर उपस्थित होते. तर संचालन व आभार प्रा.गजानन जाधव यांनी केले.