पुसद/प्रतिनिधी :-मो.मुब्बशिर
येथील वाल्मीक मेहतर समाजाच्यावतीने उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अत्याचाराच्या निषेधार्थ दि.२ ऑक्टोंबर रोजी कॅण्डल मार्च काढण्यात आला.
नवल बाबा मंदिरासमोरून मार्चची सुरवात करण्यात आली होती. निघालेल्या कॅण्डल मार्चचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधवांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कु.मनीषा वाल्मिकी या मेहतर समाजाच्या तरुणीवर पंधरा दिवसापूर्वी चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करुन शारीरिक इजा केल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले. त्या घटनेचा तीव्र निषेध येथील समाज बंधवांच्यावतीने नोंदविण्यात आला असून सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याने मनीषा वाल्मिकी इच्छावर आत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी व त्या पीडित कुटुंबांना न्याय द्यावा. तसेच उत्तर प्रदेशातील प्रशासन आरोपींना पाठीशी घालत असल्यामुळे त्या प्रशासनाचा सुद्धा निषेध करण्यात आला. कु.मनीषा वाल्मिकी हिला नवल बाबा वार्डातील समस्त वाल्मिकी समाज बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी उपस्थित समाज बांधवांमध्ये भैयालाल टाक, अमर तुंडलायत, जय अशोक उंटवाल, राजा तुंडलायत, आकाश सांबरे, विजय तुंडलायत,संतोष उंटवाल,संजय डागर, सुमित पवार, तुषार डागर, उमेश तुडलायत, शुभम गोयर, विक्रम उंटवाल, शुभम पवार, रामु डागर, राहुल तुंडलायत,अजय कोरीसकत, तिलक डागर, कैलास सांबरे, शंकर गोरे,श्याम सावळे, अनिल काटकर, पंकज डांगर,विजय सोनवाल, विजय पवार, रामधन जाधव जादुसंकतसह
समस्त नवलबाबा मित्रमंडळ वाल्मिकी मेहतर समाज उपस्थित होते.