मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करा सकल मुस्लिम युवक, उमरखेड तर्फे मागणी,
उमरखेड /प्रतिनिधी :
दिनांक 16 सप्टेंबर रोजी धारूर येथील तब्लिग जमात चे आमिर (प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार आंबेजोगाई येथे अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजताच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला थांबले होते. यावेळी काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांना पोशाखा वरून ओळखून जातीवाचक व धार्मिक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात काझी निजामुद्दीन व सोहेल तांबोळी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पुरोगामी महाराष्ट्र धर्माच्या नावाने हल्ला होणे खूप चिंताजनक बाब आहे. यापूर्वी सुद्धा पुण्यात मोसिन शेख यांची व पालघर येथे दोन साधूंची मॉब लिंचींग झाली होती. हा एका प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावरच हल्ला आहे. जिल्ह्यात व राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडेल व सामाजिक वातावरण दूषित होईल या अनुषंगाने धर्माच्या नावावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमरखेड येथील सकल मुस्लिम युवकांना तर्फे ना.अनिल देशमुख साहेब ( गृहमंत्री ) यांना तहसीलदार उमरखेड मार्फत करण्यात आली आहे. यावेळी शाहरुख पठाण, ताहेर शाह, ऍड. शे. अन्सार, डॉ. अयुब पठाण आदी उपस्थित होते.