ताज्या घडामोडी

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

मुंबई दि (प्रतिनिधी)

देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत असून लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, मनुवादी शक्तींना रोकण्यासाठी बहुजन ह्दय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन ऐक्य होईल असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
रिपाईच्या सर्व गटाचे ऐक्य होऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एक होऊन युवा वर्गाला प्रतिनिधित्व देऊन अन्य वरिष्ठ आंबेडकरी नेत्यांनी युवा वर्गाला प्रोत्साहित करून डॉ बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष व दलित पँथर सारखा आक्रमक बाणा पुन्हा निर्माण व्हावा यासाठी पक्षातर्फे सकारात्मक पाऊले उचलली जाणार आहेत अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे असे नमुदिले आहे की, भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून संबंध देशात मनुवाद फोफावत आहे. मुस्लिम, बौद्ध, दलित, मागासवर्गीय व वंचित घटकांवर अन्याय अत्याचार केला जात असून संविधान संपविण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. आरक्षण पूर्ण: संपविले आहे. शिक्षणाची पायमल्ली केली जात आहे, खाजगीकरनाच्या माध्यमातून देश विकला जात आहे, दिन दलित दुबळे व मुस्लिमांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जात आहेत.
ईवीएम च्या माध्यमातून सत्ता काबीज करून विरोधी पक्ष संपवला जात आहे, लोकशाही कमजोर झाली असून लवकरच संविधान संपनार आहे.
लॉकडाऊन चा सहारा घेऊन भारताच्या महत्वाच्या कंपन्या विकल्या जात आहेत.
आधी मुस्लिम तर दलित व बौद्धांना टार्गेट करून देशात भगवा दहशतवाद पसरविला जात आहे.
बहुजन महानायकांचे पुतळे तसविरी च्या विटंबना केल्या जात आहेत, जातीय तेढ निर्माण होऊन राष्ट्राची एकता व अखंडता मोडीत काढली जात आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे, न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे यावर कब्जा करून मनुवाद मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे. या व अन्य राष्ट्रहिताच्या बाबीसाठी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा अखंड भारत जपायचा असेल तर सर्वप्रथम रिपाइंचे सर्व गट तट एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर आंबेडकरी चळवळ मजबूत व्हावी यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्ष प्रमुखांना भेटून भारत बचाव मोहीम रिपाई डेमोक्रॅटिक पक्षमार्फत चालविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकनिकर यांनी दिली आहे.
राज्यातील रिपाइंचे सर्व गट एकत्र येऊन ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ वाढवावी व संबंध देशातील आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना एकत्र करण्याचा ही मनोदय आरपीआय डी चे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकनिकर, राज्य महासचिव पँथर श्रावण गायकवाड, बंजारा सेल प्रमुख शिवाभाई राठोड, दक्षिण भारतीय सेल मुंबई प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, उत्तर भारतीय सेल चे युवा मनीष यादव यांच्या स्वाक्षरीनिशी हे प्रसिद्धी पत्रक प्रसारित झाले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *