क्रीडांगण

आर्णी_यवतमाळ / साहेबराव मोहोड यांची प्रकल्प समन्वयक पदी निवड

 

इरफान रज़ा यांची रिपोट

आर्णी: सामाजिक कार्यात नेहमी अग्रणी राहणारे शिक्षक आघाडीचे साहेबराव मोहोड यांची सर फाउंडेशन पुसद प्रकल्प समन्वयक पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्व.गणपतराव पाटील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिकणी(क.) जिल्हा यवतमाळ येथील शिक्षक साहेबराव मोहोड हे शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. विभागीय आश्रम शाळा संघटक शिक्षक आघाडी अमरावती तसेच अध्यक्ष अनुदानित आदिवासी आश्रम शाळा कर्मचारी संघटना प्रकल्प पुसद जिल्हा यवतमाळ ही पदे सांभाळत सामाजिक कार्याची आवड असलेले साहेबराव मोहोड हे ‘स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र’ ( SIR फाऊंडेशन) जे देशातील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क असलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सन २००६ पासून कार्यरत आहे. देशातील या अग्रगण्य नेटवर्कशी गेली अनेक वर्षे जोडले गेले असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत, श्री नितीन केवटे समन्वयक आदिवासी आश्रम शाळा विभाग,श्रीमती हेमा शिंदे महिला राज्य समन्वयक, श्री बाळासाहेब वाघ राज्य समन्वयक,श्री सिद्धाराम माशाळे राज्य समन्वयक यांनी साहेबराव मोहोड यांची पुसद प्रकल्प समन्वयक पदी निवड केली आहे. त्यामुळे शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव पडत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *