ढाणकी शहर प्रतिनिधी (शेख शाहरुख)
कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होण्यास विलंब लागलेला आहे. पण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खोळंबा होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दि 26 जुन रोजी शाळा समितीच्या माध्यमातून बैठक घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दरवर्षी 26जुन रोजी शैक्षणिक सत्राला सुरूवात होत असुन शाळेचा पहिला ठोका 26 जुन रोजीच वाजते यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्यात आले नाही. राज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असल्याचे बघत शाळा कधी सुरू होतील असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडत आहेत
तसेच राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण व शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार ढाणकी टेंभेश्वरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा येथे दि. 26 जुन रोजी शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली बैठकीत शाळा समितीने सांगितले की शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची व परिसराची स्वच्छता करण्यात येईल तसेच आमच्या गावात किंवा परिसरात कोरोनाचे एकही रूग्ण आढळून आले नसून शाळेला कोरॅनटाईन सेंटर करण्यात आले नाही व नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने शाळेच्या इमारतीला हानी झाली नाही व आमच्या कडे विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना 1 मीटरचे अंतर ठेवून मास्क, सॅनिटाईझर चा वापर करू आणि वर्गामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करून शाळा सुरू करण्यात येईल. असे सांगितले यावेळी मुख्याध्यापिका सलमा नुर मॅडम, शेख मुखीत पटेल सर व शाळा समितीचे अध्यक्ष शेख जबार शेख महेमुद, उपाध्यक्ष शेख समीर शेख आमीर सदस्य शेख बाबु शेख फकीरा, असद खान इनुस खान, शेख फिरोज आदि उपस्थित होते