ब्योरो रिपोट // महागावं यवतमाळ
आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यातील सुकळी व महागाव तालुक्यातील खडका शिवारातील शेतीला माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
आधीच कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या पुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे, त्यातच पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकरी बांधव पुरता हवालदिल झाला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाकडे खासदार साहेबांनी केली. त्यानुसार नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी सोबत शिवसेना उमरखेड तालुका प्रमुख सतीश नाईक, महागाव तालुका प्रमुख शाखा भरवाडे, उमरखेड शहर प्रमुख संदीप ठाकरे, महागाव शहर प्रमुख राजू राठोड, उमरखेड उपतालुका प्रमुख रवी रुडे,राम तंबाखे महागाव पं.स.उपसभापती,ज्येष्ठ शिवसैनिक ,अनिल आण्णा नरवाडे,विनायक कदम,राहुल सोनुने गजेंद्र ठाकूर,अतुल मैदय, वसंतराव देशमुख,अजय नरवाडे ,सुकळीचे सरपंच शिवाजी रावते, उमरखेड तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, शेतकरी, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.