पुसद मध्ये तळीरामांचा भ्रमनिरास
प्रतिनिधी/पुसद
जिल्हाधिकारीने संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात दारू विक्रीची परवानगी दिल्याची माहिती मिळत मिळताच पुसद मधील तळीराम गदगद झाले होते.
मात्र काही मिनिटांमध्येच दारूविक्रीवर बंदी राहणारच असल्याचे आदेश काढल्याने पुसद मधील तळीरामांचा भ्रम निरास झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना संक्रमणामुळे करण्यात आला आहे. यवतमाळ शहरात कोरड कोरोना रग्णाची संख्या वाढत चालली आहे.
यामुळे यवतमाळ जिल्हा रेड झोन मध्ये आला आहे. असे असतानाही यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 5 मे 2020 आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत राहील मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली होती. या परवानगीनुसार जिल्ह्यातील विक्रीचे दुकान चालू करण्यात आले होते. तसे इतर ठिकाणी मध्य विक्रीचे दुकान चालू होणार ह्या बातमीने तळीराम खुश झाले. उद्या सकाळीच मद्य विक्रीसाठी तयारी करत काही तासापूर्वी अचानक यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी मद्य विक्री बंद बाबत आदेश काढले. त्यात सूचित केले की, नगरपरिषद हद्दीमधील अनुज्ञप्त्या वगळता जिल्ह्यातील उर्वरित विभाग भागातील किरकोळ विक्रेत्यांना मद्य विक्रीसाठी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी आदेश देण्यात आले होती. या आदेशामुळे तळीराम गदगद झाले होते. सोबतच मद्य विक्री दुकानातही सोशल डिस्ट सिंगचे पालन व्हावे यासाठी बांबूचे कठाडे लावण्यात आले होते. सोबतच चुन्याने गोल रिंगण करण्यात आले होते. गोल रिंगन करताच तळीरामाने पहिला नंबर लावण्याकरिता स्वतःच्या चपला व बूट त्या रिंगणात ठेवण्यात आल्याने संपूर्ण पुसद शहरात चर्चेचे विषय बनला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्याने दिलेले आदेश मागे घेतल्याने रामाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे तळीरामांना कोरडा घसा घेऊन घरी जाण्याची वेळ आली होती