वाई बाजार येथे 650 कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते मोफत धान्य वाटप .
प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड)
वाई बाजार येथील रास्त धान्य दुकान क्रमांक 144 /2 चे दुकानधारक तथा वाई ग्रामपंचायतचे उपसरपंच ” हाजी उस्मान खाँ “यांनी चालू महिन्याचा 220 कट्टे गहू 125 कट्टे तांदूळ व 8 कट्टे साखरेचा चालान भरून 650 कुटूंबियाना मान्यवरांच्या हस्ते धान्य वाटप केले असून.
कोरोना महामारी मुळे देशाचीच नाही तर, राज्याची अर्थव्यवस्था ढासळली असून याचा सर्वात जास्त फटका दररोज मोलमजूरी करून खाणा-याना म्हणजेच ज्यांचा हातावर पोट आहे.
अश्या कुटुंबीयाना बसला असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,.
वाईत एक छोटीसी मदत म्हणून वाई ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा 144 /2 चे रास्त धान्य दुकानधारक,” हाजी उस्मानखान यांनी” एका महिन्याचा धान्य 220 कट्टे गहू 125 कट्टे तांदूळ व आठ कट्टे साखर हे त्यांच्या 650 कार्डधारकांना मोफत वाटायला आज दि.5 मे, रोजी सुरवात केली असून
या शुभ कार्यसाठी माहूर/ किनवट तालुक्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव ,माहूर चे तहसीलदार सिद्धेश्वर, वरणगावकर यांना अमंत्रीत करुन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी याप्रसंगी आदिम समाजातल्या कोलाम व आदिवासी समाजाचा एकही कुटुंब विना राशन कार्ड नसावं अशा सूचना तहसीलदार, ग्रामसेवक, व तलाठी यांना दिल्या.
सहाय्यक जिल्हाधिकारी ,नांदेड जि.प मा.ऊपाध्यक्ष समाधान जाधव तहसीलदार वरणगावकर यांनी वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली व प्रा.आरोगय केन्द्राचे डाँ.होलसुरे, यांना कोरोणा संदर्भामध्ये अधिक सूचना दिल्या याप्रसंगी सिंदखेडा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक “मल्हार शिवरकर “मंडळाधिकारी “सुगावे “तलाठी “विश्वास फड,वाई येथील ग्रामसेवक एस.आर.गुंडमवार,वाई ग्रामपंचायतचे सरपंच,पोलीस पाटील आशाबाई मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास बेहरे,नविद खान,अँन्टि कोरोना कवच समितीचे सदस्य फिरोजखान हैदर खान पठाण हे ऊपस्थीत होते.