आरोग्य

ढाणकी येथे मुंबई येथून आलेले ३५ नागरिकांना कोरोना कक्षात दाखल,15 दिवस गावा बाहेर कोरनटाइनमध्ये ठेवले,

ब्योरो रिपोट,इरफान शेख,ढाणकी

रुग्णांची प्राथमिक तपासणी करताना प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ धनवे साहेब व त्यांचे सहकारी
ढाणकी नागरपंचायतीने स्थापन केले कोरोना कक्ष मुंबई येथून आलेले ३५ नागरिकांना कोरोना कक्षात दाखल,
ढाणकी…. शहरात पोटाची खळगी भरण्या साठी गेलेले नागरिक कोरोना विषाणू भीतीमुळे मायभूमी गावाकडे मिळेल त्या वाहनाने किंवा पायी येत आहेत . त्यां ना शहरांमध्ये येऊ न देता कोरनटाईन म्हणून चौदा दिवस गावाबाहेर एका शाळेत त्यांच्या राहण्या, जेवणाची पिण्याची सर्व व्यवस्था नगरपंचायत व सामाजिक कार्यकर्ते गावपुढारी मिळून करीत आहेत.

ढाणकी नगरपंचायत नगर उपाध्यक्ष जाहीर जमीनदार यांनी तात्काल आयसोलेशन कक्ष स्थापित केले. ढाणकी शहरातून स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्या करिता नागरिक मुंबई पुणे हैदराबाद गावी गेले होते परंतु कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना देशभर लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे काम करण्याकरिता गेलेल्या ठिकाणी हाताला काम ही नाही दाम ही नाही वरून कोरोना या संसर्गजन्य बिमारी चे भेव त्यामुळे शहरात स्थायिक झालेले नातेवाईक जवळ येऊ देण्यास तयार नाहीत यासर्व गोष्टीला कंटाळून मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठत आहेत

काल रात्री ढाणकी शहरात मुंबई वरून पाच पंनास नागरिक रात्री च्या वेळी शहरात दाखल होणार याची खबर शहरातील रोहित वर्मा यांना माहिती लागली त्यांनी लगेच ठाणेदार, नगरपंचायत ला कळविले नगराध्यक्ष सुरेश जैस्वाल व नगर उपाध्यक्ष शेख जहीर जमीनदार शेख मोला यांनी त्या नागरिकांची व्यवस्था एका शाळेमध्ये करण्यात आली त्यांच्या ३५ नागरिकांची तात्पुरती जेवणाची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते रोहित वर्मा यांनी केली व 14 दिवसाकरीता लागणारे राशन लोकवर्गणीतून ढाणकी नगर पंचायत कार्यालयात जमा करण्यात आले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *