45 पोती मालाचा ताबा दाखवि ऱ्यावर कारवाई कंट्रोलचा माल असल्याचा संशय
प्रदयफएफरजरुटीयय्युतिनिधी पुसद
येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये 45 पोती कंट्रोलचा माला आणून टाकल्याच्या संशयावरून तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षकांनी कारवाई केल्याचा प्रकार आज दिनांक 28 एप्रिल रोजी घडला आहे.
याबाबत बाजार समितीचे सभापती शेख कौसर यांनी दिलेल्या माहितीवरून आज दिनांक 28 एप्रिल रोजी बाजार समितीच्या दिग्रस रोड वरील औद्योगिक वसाहतमध्ये 45 पोती विना नोंदणी गव्हाची बेवारस असल्याचे मार्केटचे संचालक विनोद सरकर यांच्या निदर्शनास आला. बाजार समितीच्या यार्डमध्ये निर्बान टेंडरचा मालक मुस्ताक हाजी गुलाब निर्बान व रामरस ट्रेडर्सचे मालक संतोष राठी हे दोनच व्यापारी माल खरेदीसाठी बाजार समितीच्या यार्डमध्ये आले होते. यात निर्बान टेडरने 750 पोती गव्हाचा माल खरेदी केला होता. तर रामरस ट्रेडर्सने 250 गव्हाचा माल खरेदी केला होता. त्यात निर्बान ने यार्ड मध्ये बेवारस ठेवलेला 45 पोती गव्हाच्या मालावर दावा करीत 19 पोती गहू त्याने खरेदी केलेल्या 750 पोती गव्हा मध्ये मिसळवित असल्याची निदर्शनात आले. याबाबत सरगर यांना माहिती कळताच निर्बान यांनी संचालक सरगर व बाजार समितीचे सभापती शेख कौसर यांच्या सोबत वाद घातला. त्यानंतर सरगर यांना आलेल्या संशयावरून तो मालक कंट्रोलचा असल्याचे समजताच त्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक रावलोड यांना माहिती दिली. त्यानंतर पुरवठा निरीक्षक यांनी तात्काळ मार्केट मध्ये येताच कारवाई करीत 45 पोत्यातील गव्हाचे नमुने चौकशी साठी ताब्यात घेतले व यार्डमध्ये ठेवलेल्या जप्त केला आहे. वृत्त उत्तर पुरवठा निरीक्षकाची कारवाई सुरू होती.
विना नोंदणी चा माल यार्डमध्ये आलाच कसा येथील बाजार समितीच्या शेडमध्ये 45 पोती गव्हाचा माल संशयास्पद आढळून आला याबाबत आम्हाला ही शंका आली की हा माल कंट्रोलचा आहे त्यामुळे आम्ही तात्काळ पुरवठा निरीक्षकास संपर्क साधून याबाबत माहिती दिली यावेळी निर्ब्रान ट्रेंडर्सचे मालक यांचा दावा या पोत्यावर करीत हुज्जत बाजी करीत होते.
आम्ही त्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस करू
शेख कौसर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद