क्राईम डायरी

वाई बाजार येथे सर्व मार्केट बंद असतांना हार्डवेअर चे दुकान मात्र सुरू होते पत्रकार यांच्या शिफारस मुळे पोलिस निरीक्षक यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,

 

प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड)

वाई:- Covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन इटनकर यांच्या आदेशानुसार वाई बाजार येथील ग्राम पंचायत कार्यालय यांच्या घेतलेल्या चांगल्या प्रकारच्या पुढाकाराने गावामध्ये सुख शांती नांदत आहे व त्यांनी ठरवल्या प्रमाणे वाई बाजार हे नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असून सुद्धा या गावातील जनतेने आपले दुकान आठवड्यातून 3 दिवस सुरू ठेवण्याचे निर्णय घेतले परंतु दि.30 एप्रिल रोजी दुकाने बंदचा दिवस असून सुद्धा गावातील प्रकाश राजूरकर यांचे हार्डवेअर चे दुकान मात्र सुरू होते याची बातमी कळताच होमगार्ड महेश कोटूलवार यांनी दुकानात जाऊन दुकानं बंद केले व दुकांदारास पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या समोर हजर केले असता गावातील पत्रकार कार्तिक बेहेरे यांनी कायद्याचे उल्लंघन केलेल्या दुकान दाराची जाणीवपूर्वक शिफारस करून सोडून द्या असे त्यांनी म्हटले त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकांदारावर पोलिस निरीक्षक यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *