ता.पुसद मध्ये प्रशासनाच्या मेहेरबानीने धनदांडग्यांच्या दुकानदारी सुरू
पुसद तालुका प्रतिनिधी:-मो. मुबश्शीर
देशात कोरोना संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशामध्ये लॉक डाऊन घोषित केलेले आहे.
लॉक डाऊनच्या कार्यकाळामध्ये जीवनावश्यक वस्तुं व्यतिरिक्त कोणतीच दुकाने, प्रतिष्ठाने उघडी करून व्यवसाय करण्याची ची परवानगी नाकारलेली आहे. परंतु पुसद शहरांमधील काही धनदांडग्यांनी स्थानिक प्रशासना सोबत अर्थपूर्ण संबंध जोपासून आपली दुकाने, प्रतिष्ठाने उघडी ठेवून व्यवसाय करीत असल्याचा प्रकार नागरिकांना दिसून येत आहे.
पुसद शहरांमधील अति गजबलेली परिस्थिती असणाऱ्या सुभाष चौक मधील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, प्रतिष्ठाने नियमा ला अनुसरून सुरू आहेत.ग्राहकांची दर्दी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतल्यी जात आहे. शासनाने आखून दिलेल्या, निर्बंधित केलेल्या नियम अटीची पायमल्ली करीत टिन पत्राची दुकाने,जनरल स्टोअर्स, चैनीच्या वस्तू विक्री करणारी दुकाने उघडून अशा दुकानांमधून सर्रासपणे सामानांची विक्री केल्या जात आहे. लाँक डाऊन ची तमा न बाळगता ग्राहकांची गर्दी जमवित आहेत. अशा टिन पत्रे, सौंदर्यप्रसाधने चैनीच्या वस्तूसाठी नागरिक प्रचंड गदारोळ करीत सामान खरेदी करीत आहेत.
शहरांमधील सुभाष चौक स्थित काही जीवनावश्यक बाबींशी सबमध नसलेली दुकाने, प्रतिष्ठाने स्थानिक प्रशासनाने अर्थपूर्ण संबंध सांभाळीत अशा दुकानदारांना त्यांच्या दुकानांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश तर केला नसावा ना ? म्हणूनच अशी धनदांडग्याची दुकानदारी,व्यवसाय सुरू असावित असा प्रश्नही ही सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे.
वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल घेत केरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भीव रोखण्याचे दृष्ठीने स्थानिक प्रशासनातील जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना योग्य ती समज देऊन कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी तंबी द्यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.




