हिमायतनगर तालुक्यात लाकॅडाऊनचा फायदा घेत अवैधरित्या देशी विदेशी दारु विक्री जोरात.
राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
देशि चे भाव गगनाला भिडले 60 रुपये याचि 250 ला
दारुची चढ्या दराने विक्री.गुटका विक्रेत्यांची चंगळ
तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू गुटखा विक्री होताना दिसते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष.
कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या काळात तालुक्यातील जनता हतबल झाली असताना त्यावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी जारी केली असून जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या असताना सुद्धा दारूचा महापूर कोठून येतो कुणास ठाऊक व राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांच्या दुर्लक्षित पणामुळे चालते की काय.असे सुजाण नागरिकांतून बोलल्या जात आहे
अवैद्य गुटका, देसी दारू, विदेशी दारू ,तालुक्यामध्ये सर्रास विक्री होत असल्याचे दिसते. जिल्ह्यातुन गुटका देशी विदेशी दारु विदर्भात सध्या वाहतूक होत असताना दिसते. एक महिन्यापासून दळणवळणाची साधने सर्व व्यवहार बंद असून सुद्धा संचारबंदी सुरू असताना मात्र हिमायतनगर शहरात व ग्रामीण भागासह उत्पादन शुल्क विभागाचे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे बाहेरून दारूचे दुकान बंद मागच्या दाराने सर्रास विक्री होत आहे. विदेशी दारू च्या किंमतीत दुप्पट वाढ झाली असल्याने अंनेकांचे संसार उद्धवस्त होत असतांना दुकानदारांनी भरपूर कमाई करून घेत आहेत. महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना गुटका व्यवसायचे हिमायतनगर केंद्र बनले आहे .खेडेगावात गुटका खुलेआम विक्री विमल गुटखा तिन रुपये याची पुडि दाहा रुपये ला झाले आहे
आहे होलसेल डीलर कडून किरकोळ विक्रेते सकाळी पाच या वेळेत गुटखा विक्रेते किराणा दुकानावर पोहोचतात विमल पुडी पोहचविण्याचे काम करतात त्यामुळे विमल पुडी दाहा रुपये,मुसाफीर पुडी पाच रुपये, सुरज पुडा चारशे रुपये तोटा दाहा रुपये अशा दुप्पट तीप्पट दराने खुलेआम विक्री होतअसून सुद्धा ऊत्पादन शुल्क विभाग प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. हिमायतनगर शहरात देशी विदेशी दारू गुटखा कुठून येत असेल नाका-बंदी चा काय उपयोग प्रशासनाला माहित असून कारवाई का होत नाही.वरीष्ठाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी.
उमरखेड पोलिसांनी पकडलेल्या घटकाचे कनेक्शन हिमायतनगर
यवतमाळ जिल्ह्यातील ऊमरखेड विभागाने उमरखेड येथील लिंबगाव मार्ग महिंद्रा पिकप वाहन क्रमांक 29 ईए5785 भरून जात असताना लींबगावयेथील ग्राम सुरक्षा दलाने वाहन पकडले .पोलिसांनी कारवाई करून गुटखा जप्त केला. जप्त केलेल्या या अगोदर कारवाई होऊन असे असतानासुद्धा गुटखा वाहतूक सुरू च होती. लाकडाऊन चालु असताना गुटका वहातुक कशी होते .? हिमायतनगर शहरात गुटका विक्रेत्यांची चंगळ असल्याचे दिसून येते आहे