आरोग्य

ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला पं स सभापतींची भेट. भेटीत जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या.

ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला पं स सभापतींची भेट.
भेटीत जाणून घेतल्या रुग्णालयातील समस्या.

ढाणकी प्रतिनिधी :-

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उमरखेड पंचायत समितीचे सभापती प्रज्ञानंद खडसे यांनी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली व कर्मचारी तसेच रुग्णाच्या अडचणी जाणून घेतल्या.
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सध्या वाढत असून त्यावर प्रतिबंध उपाय काय करावे याविषयी ते बोलत होते. रुग्णालयात आल्यावर त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ धनवे यांची भेट घेतली व नव्यानेच स्थापन केलेल्या कोरोना कक्षाची पाहणी करून ढाणकी शहरांत बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची संख्या सुद्धा जाणून घेऊन बंदी भागातील दवाखान्यांना भेट देण्यासाठी रवाना झालेत. या भेटी दरम्यान त्यांच्या सोबत पंचायत समितीचे उपसभापती सौं विशाखाताई शंकर जाधव, सहा. गटविकास अधिकारी के पी सोनटक्के , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. अविनाश खंदारे, ढाणकी शहराचे उपाध्यक्ष शेख जहीर, ओमा पाटील चंद्रे, नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, संभाजी गोरटकर इत्यादी मान्यवर उपस्तित होते.

कोट

ढाणकी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असून परिसरातील नागरिकांनी कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी आशा स्वयंसेविका, नर्स, पोलीस यांना सहकार्य करावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, व बाहेर गावावरून आलेल्या लोकांनी स्वतःच्या व दुसऱ्याच्या आरोग्याच्या अनुशंघाने आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

प्रज्ञानंद खडसे सभापती पंचायत समिती उमरखेड

प्रतिनिधी :- इरफान शेख ढाणकी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *