ताज्या घडामोडी

विकास पाटिल देवसकर तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार यांना निवेदन. गेल्या आठ ते दहा दिवसांत प्रचंड पाऊस झाला.सरसगट पिक विमा मंजूर करुण द्यावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

विकास पाटिल देवसकर
तालुका कॉंग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार यांना निवेदन.

प्रतिनिधी :- हिमायतनगर

तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन शेतकर्यास आर्थिक मदत व सरसकट पिक विमा मंजूर करावा अशी मागणी हिमायतनगर तालुका कॉंग्रेस(आय)कमिटी तर्फे तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांत प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन मातीमोल झालेय. या पावसामुळे वेचण्यासाठी आलेला कापूस काळा पडलाय. तर उडीद, मुगाला जागेवरच मोड फुटले आहेत. ज्वारी आणि मका पिकांचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगाम हाथातून गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरक्ष: अंधारात गेलीय. जिल्ह्यात या पावसामुळे प्रचंड असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारी मदतीची गरज आहे. मात्र सरकारच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने रीतसर पंचनामे करून आपला अहवाल पाठवणे गरजेचे आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुका कॉंग्रेस(आय)कमिटीचे तालुका अध्यक्ष विकास पाटिल यांनी तहसील प्रशासनाला निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन सरसगट पिक विमा मंजूर करुण द्यावा अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर,कॉंग्रेस शहर अध्यक्ष संजय माने,मूनवर मिर्झा, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फिरोज खुरेशी,रामराव डॉ प्रकाश वानखेडे पळसपुरकर सूर्यवंशी,गणेश शिंदे,समद खान,अखिल भाई,नगरसेवक शेख रहीम सेठ,सरदार खान, अहमद भाई,सुभाषराव शिंदे,बाबा खान,गणि भाई,सचिन माने,किशन नरवाडे,फिरदोस भाई,परमेश्वर भोयर,अरविंद वानखेडे,अक्षय गुंडेवाड,विजय सूर्यवंशी,सुनील वानखेडे,सह असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते..

प्रतिनिधी :- शेख चाँद शेख तैयब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *